नांदूरशिंगोटे : येथील बोगदेवाडी येथील आदिवासी रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे आदिवासी बांधवांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. माजी सरपंच पी. डी. सानप, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव शेळके, माजी उपसरपंच रामनाथ शेळके, नारायण शेळके, भाऊपाटील दराडे, माजी उपसरपंच बस्तीराम आगिवले यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. बोगद्याची वाडी येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहत असून, चास रस्त्यापासून वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. संघर्ष ग्रुपचे संदीप शेळके व तुकाराम मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार माणिक कोकाटे यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल गाऱ्हाणे मांडले होते. कोकाटे यांनी तत्काळ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेशी चर्चा करून रस्त्याच्या कामास सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाने तत्काळ रस्ता मजबुतीकरणाच्या कामास प्रारंभ केला आहे. यावेळी संदीप शेळके, तुकाराम मेंगाळ, राजेंद्र दराडे, सुरेश कुचेकर, कैलास भाबड, निलेश कर्डक, सुरेश मेंगाळ, विनायक अगिवले, मनोहर आगिवले, गंगाराम मेंगाळ, साहेबराव पथवे, रावसाहेब पवार, नावजी पथवे, एकनाथ आगिवले, संदीप पथवे, शाखा अभियंता बी. के. आचट आदीसह आदिवासी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------------
नांदूरशिंगोटे येथील बोगदेवाडी रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी माजी सरपंच पी. डी. सानप व लक्ष्मणराव शेळके, रामनाथ शेळके, नारायण शेळके, भाऊपाटील दराडे, बस्तीराम आगिवले, तुकाराम मेंगाळ, संदीप शेळके आदी. (१० नांदूरशिंगोटे १)
100921\10nsk_18_10092021_13.jpg
१० नांदुरशिंगोटे १