येवला : तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मांजरपाडा, पालखेड कालवा पाणीप्रश्नाबाबत भाजपाचे प्रांतिक सदस्य बाबा डमाळे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शेलार होते. यावेळी रावसाहेब दानवे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील धरणे अपूर्ण आहेत. तीस- पस्तीस वर्षांपूर्वी एखाद्या धरणांचे पाच कोटींचे बजेट होते, ते आज ५०० कोटींचे झाले आहे. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक संपन्न झाली असून, अपूर्ण धरणांच्या, बंधाऱ्यांच्या, पाटपाण्याचा पाणीप्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे ठरले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. मांजरपाडा व पालखेड पाणी समस्यांवर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना अपूर्ण कामांच्या बाबत एक बैठक मंत्रालयात घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले. बाबा डमाळे यांनी प्रास्ताविकात मांजरपाडा प्रकल्प, पालखेड कालवा व अन्य लघुपाझर तलाव व तालुक्यातील इतर पाणी प्रश्नावर अनेक वर्षांपासून पुढाºयांनी झुलत ठेऊन जनतेला वेड्यात काढल्या बाबतचे परखड मत व्यक्त केले. सुत्रसंचलन हरिभाऊ भागवत यांनी केले. आभार रामुदादा भागवत यांनी मानले. याप्रसंगी तात्यासाहेब लहरे, प्रमोद सस्कर, जयाजी शिंदे, रंगनाथ भोरकडे, माणिकराव रसाळ, माणीकराव दौंडे, संदीप मुरकुटे, नारायण भोरकडे, बाबा शंकर सोनवणे, बाळासाहेब काळे, अरु ण देवरे, आप्पासाहेब भागवत, दिलीप भागवत, संजय भागवत, हरु ण शाह, फारु क शाह, बाबासाहेब पगारे, राजू पगारे, छगन मगर, भाऊसाहेब पवार, शंकर चव्हाण, सुभाष बहादूर, रावसाहेब मगर, शरद पवार, अशोक रोठे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
रस्ते सुरेगावला मांजरपाडाप्रश्नी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 1:49 AM