कळवण : मोकभणगी रस्त्यावरील पुनंद नदीवरील पुलाजवळ ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार लक्ष्मण दादाजी हिरे हा युवक जागीच ठार झाला, तर पत्नी सुनीता हिरे जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. देसराणे व मोकभणगी येथील ग्रामस्थांनी दोषींवर कारवाईसाठी काहीकाळ कळवण पोलीस स्टेशनसमोर रस्ता रोको आंदोलन करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी रात्री एक ते दोन वाजेदरम्यान मोकभणगी रस्त्यावरून कळवणकडे भरधाव निघालेल्या ट्रॅक्टरने कळवणकडून मोकभणगीकडे जाणाºया देसराणे येथील हिरे दांपत्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात लक्ष्मण हिरे हा युवक जागीच ठार झाला असून त्यांची पत्नी सुनीताबाई जखमी झाल्या. सुनीताबाई यांनी जखमी अवस्थेत ट्रॅॅक्टरचालकाला पकडले असता त्याने व त्याच्या साथीदाराने त्यांना धक्का देऊन बाजूला फेकले. तसेच मोटारसायकल स्टॅण्डवर उभी करून मयत हिरे यांचे प्रेत मोटारसायकलवर टाकून ट्रॅक्टरचालक व साथीदाराने पळ काढल्याचे ग्रामस्थांनी सांगून संताप व्यक्त केला. मृत्युमुखी पडलेला देसराणे येथील २६ वर्षीय युवक लग्न समारंभ आटोपून घरी परतताना सदर घटना घडली. दरम्यान पोलीसपाटील योगेश शेवाळे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामस्थ रस्त्यावर : मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार ट्रॅक्टरच्या धडकेत पती ठार, पत्नी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 1:26 AM
कळवण : मोकभणगी रस्त्यावरील पुनंद नदीवरील पुलाजवळ ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार लक्ष्मण दादाजी हिरे हा युवक जागीच ठार झाला.
ठळक मुद्देकळवण पोलीस स्टेशनसमोर रस्ता रोको आंदोलनमृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला