रस्ता नसल्याने पावसाळ्यात व इतर हंगामात शेतमालाच्या वाहतुकीत समस्या निर्माण होत असत. बैलगाडी, दुचाकी फसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागायचे. त्यातून किरकोळ अपघात होत असत. म्हणून कांदे वस्तीवरील लोक दहा वर्षे मागणी करत होते. परंतु त्यांच्या रास्त मागणीला ग्रामपंचायतीमध्ये केराची टोपली दाखविली जात असे.
कोरोना काळात दहा तरुण शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी आपल्या वर्गणीतून दीड किमी रस्ता पूर्ण केला. यामुळे तीस हेक्टर शेती क्षेत्र रस्त्याला जोडले गेले. रस्त्यासाठी लागणारा दगड व मुरूम शेतकऱ्यांच्या विहिरीचा वापरण्यात आला. रस्त्यासाठी सुमारे दीड एकर शेती क्षेत्र कामी आले.
नवनाथ कांदे यांच्यासह सर्व कांदे बाळू, काळू, लहानू, अशोक, सुरेश, नामदेव, सुदाम, सखाहरी, हनुमान यांनी रस्त्यासाठी श्रम केले. (१५ नांदगाव २)
===Photopath===
150621\15nsk_5_15062021_13.jpg
===Caption===
१५ नांदगाव २