शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रस्त्याचे काम कागदावरच, पैसे मक्तेदारांच्या खिशात

By admin | Published: December 23, 2014 12:09 AM

रस्त्याचे काम कागदावरच, पैसे मक्तेदारांच्या खिशात

नाशिक : निफाड तालुक्यातील दोन रस्त्यांची कामे कागदावरच पूर्ण करून मक्तेदारांनी कामांची पहिल्या टप्प्यातील रक्कमही काढून घेतल्याचा प्रकार माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम शेलार यांनी काल मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या निदर्शनास आणून दिला.जिल्हा नियोजन मंडळाकडून निफाड पंचायत समितीस बिगर आदिवासी भागातील रस्त्यांची कामे व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यातीलच या दोन रस्त्यांच्या कामांबाबत राजाराम शेलार यांनी सुखदेव बनकर यांच्याकडे तक्र्रार केली. त्यानंतर सुखदेव बनकर यांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याना या दोन्ही रस्त्यांची कामे झाली आहेत काय? आपण त्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी येणार असून, रस्ते झालेले नसल्यास संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा दिला. निफाड ग्रामपंचायतीअंतर्गत नाशिक - औरंगाबाद महामार्ग ते जुने शिवरे वस्ती या सुमारे दोन किलोमीटर वस्तीचा रस्ता व शेलार वस्ती ते कापसे वस्ती हा अर्धा किलोमीटरचा रस्ता अशा दोन रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, या दोन्ही रस्त्यांच्या कामांची पहिल्या टप्प्यातील देयकेही काढण्यात आल्याचे समजते. या रस्त्याच्या कामावर एक पाटीसुद्धा मुरूम आणि खडी पडलेली नसताना प्रत्यक्षात बिले कशी काढली गेली? असा आरोप राजाराम शेलार यांनी केला आहे. सुखदेव बनकर यांनी बांधकाम विभागाच्या संबंधित उपअभियंत्याला याबाबत तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.(प्रतिनिधी)विज्ञान अध्यापक संघाची बैठक देवळा : तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या सुकाणू समतिीची बैठ्ठक शिवाजी मराठा हायस्कूल येथे विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनीत पवार ह्यांच्या उपस्थित संपन्न झाली यावेळी तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे विज्ञान शिक्षक उपस्थित होते देवळा तालुकास्तरीय विज्ञान अध्यापक संघाची कार्यकारिणी सर्वानुमते बिनविरोध जाहीर करण्यात आली.(वार्ताहर)उपाध्यक्षपदी पिंपळगाव (वा ) शाळेच्या शिक्षिका श्रीम व्ही डी निकम, कार्यवाहक पदी माळवाडी हायस्कूलचे शिक्षक डी एच गुप्ते, सहकार्यवाहक पदी रामेश्वर विध्यालायाचे व्ही डी अिहरे ,एन वि भामरे यांची तर कार्यकारिणी सद्ष्यपदी एम वय सावंत ,एन आर चव्हाण ,टी पी महाले,एस के निकम ,एस जी सागर ,एस एम पाटील,आर बी निकम ,आर वाय साळवे यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली .या वर्षी भऊरयेथील सिद्धेश्वर विध्यालयात 8 व 9 डिसेंबर रोजी होणार्या तेराव्या तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शन व आयोजन संदर्भातील विविध सुकाणू समतिी गठीत करण्यात येवून ह्या सामित्यांचेही ह्या वेळी चांगल्या नियोजणासाठी कार्यकारिणी गठीत करून सर्व समित्यांना नियोजन देण्यात आल्याचे विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनीत पवार यांनी सांघीतले ह्या वेळी बैठकीस उपस्थित श्री शिवाजी मराठा हायस्कूल येथे मुख्याध्यापक डी ई आहेर ह्यांनी विज्ञान अध्यापक संघात काम करत असतांना समतिीचे कार्य व धोरणानविषयी ह्या वेळी नूतन कार्यकारिणी सद्श्याना मार्गदर्शन केले ह्या वेळी नूतन कार्यकारिणीचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले एस जी सागर यांनी सूत्रसंचालन केले विनीत पवार यांनी आभार मानले (वार्ताहर)