पेठ : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ पेठ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दामू राऊत यांच्या नेतृत्वाखाली गुजरात राष्ट्रीय महामार्गावर पेठ शहरातील जुने बस स्टॅन्ड येथे रस्त्यावर रिकामे सिलिंडर ठेवून दरवाढीविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी तालुकाध्यक्ष दामू राऊत, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश गावीत, शहराध्यक्ष करण करवंदे, नितीन भोये, मोहन गावंडे, जितेंद्र जाधव, संतोष पेठकर, गोपाळ देशमूख, मोहन पवार, छबीलदास भडांगे, रामदास भोये, शामराव गावंडे, योगेश नाठे, हनुमंत कडाळी, रामदास गायकवाड, समीर टोपले, अस्लम मणियार, अतुल निरभवणे, भास्कर ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.
पेठ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:23 PM
पेठ : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ पेठ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
ठळक मुद्देजुने बस स्टॅन्ड येथे रस्त्यावर रिकामे सिलिंडर ठेवून दरवाढीविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.