कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने तालुका प्रशासन, सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी महासंघ यांनी संयुक्तरित्या शुक्र वारपासून दि. १७ ते २२ जुलैपर्यंत सहा दिवस घोषित केलेल्या जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मेडिकल व वैद्यकीय या अत्यावश्यक सेवा वगळता सर्वं व्यापारी व व्यावसायिक बांधवानी स्वयंफुर्तीने शंभर टक्के बंद ठेवून आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कळवण शहरात दहा रु ग्ण आढळून आल्यामुळे शहर व तालुक्यातील जनता चांगलीच हादरली आहे .कळवण तालुक्याला लागून असलेल्या तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ही वाढ धोक्याची घंटा मानली जात असून प्रशासनासह जनता देखील घाबरली आहे. त्यामुळे सहा दिवस स्वयंपूर्तीने जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय झाल्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, सुभाष पेठ,शिवाजीनगर, गणेशनगर, बस स्थानक, जुना ओतूर रोड, गांधी चौक, अंबिका चौक, फुलाबाई चौक, नेहरू चौक, ओतूररोड परिसरात शुक्रवारी सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.नीरव शांतता...बंदमुळे कळवणकरांनी घरात राहणे पसंत केल्यामुळे रस्त्यावर नीरव शांतता दिसून आली. जनता कर्फ्यूमध्ये मेडिकल व हॉस्पिटल वगळून बाकी सर्व सेवा बंद असून तालुक्याच्या तसेच शहरहितासाठी शहरवासीयांनी बंदचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन आमदार नितीन पवार, सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी महासंघाने केले आहे.
कळवणला जनता कर्फ्यूमुळे रस्ते निर्मनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 8:01 PM