नाशिक - गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडावी यासाठी नाशिक पोलिसांनी उत्तम नियोजन केले असले तरी सकाळी 11 वाजता मिरवणूक निघणार असताना पहाटे पाच वाजेपासूनच मध्य नाशकातील रस्ते बॅरिकेडिंग टाकून बंद करण्यात आल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते आणि अन्य कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या बंद रस्त्यांमधून सुटका करून घेण्यात मोठ्या अडथळे येत आहेत
नाशिकमध्ये सकाळी 11 वाजेच्या सुमारास पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जुन्या नाशकातील वाकडी बारक येथून गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. अर्थात ही उपचारिकत असते नंतर एक दोन मंडळे पुढे येतात नंतर पुन्हा सायंकाळ शिवाय मिरवणुका पुढे येत आहे. साधारणतः दर वर्षी अशाप्रकारे मिरवणूक निघाल्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने रस्ते बंद केले जातात मात्र यंदा पहाटेपासूनच एमजी रोड, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, टिळक पथ, गाडगे महाराज चौक, सीबीएस सिग्नल अशा अनेक भागातील रस्ते बँक टाकून बंद करण्यात आल्याने नागरिकांना कुठे जाणे शक्य झाले नाही, पोलिसांच्या अशा नियोजनाबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मिरवणूतिच्या पाच ते सहा तास अगोदर रस्ते बंद करण्याचे प्रयोजन काय असा काँग्रेसचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते सुरेश मारू यांनी केला आहे