शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

मानोरीतील रस्त्यांची मुसळधार पावसामुळे दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:19 AM

या रस्त्यावरील चिखल चाकावरील गार्डमध्ये अडकल्याने अनेक चालकांना गाडीचे मडगार्ड खोलून हातात घेऊन जाण्याची वेळ येत असते. अनेक दुचाकीस्वारांना ...

या रस्त्यावरील चिखल चाकावरील गार्डमध्ये अडकल्याने अनेक चालकांना गाडीचे मडगार्ड खोलून हातात घेऊन जाण्याची वेळ येत असते. अनेक दुचाकीस्वारांना दुचाकी घसरण्याच्या भीतीने पाच ते सात किमी जास्त अंतराच्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. हनुमाननगर (मानोरी) येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामासाठी जाण्यासाठी तसेच शेतीमाल वाहतुकीसाठी हा मुख्य रस्ता आहे. त्याकडेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामस्थांना येवला येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती, बाजार समिती अशा महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी ह्या रस्त्याची जास्तच प्रमाणात गरज भासत असते. लासलगाव-शिर्डी महामार्गावर जाण्यासाठीदेखील हा मुख्य रस्ता असून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संबंधित विभागाने तत्काळ सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून केली जात आहे.

दरम्यान, येथील मानोरी बु. ते खडकीमाळ या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचून रस्ते जलमय झाले आहेत. वाहनचालकांना साचलेल्या खड्ड्याच्या पाण्यातून रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. मुखेड फाटा येथे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असून या मुख्य रस्त्याची अवस्था पावसाळ्यात शेतशिवारातील मातीच्या रस्त्यासारखी झाली आहे. या मानोरी बु. ते खडकीमाळ रस्त्याचे देखील तत्काळ डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दिवसेंदिवस अवस्था खूप वाईट होत चालली असून, त्या रस्त्यांची कामे तातडीने होणे गरजेचे आहे.

नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावावे. - नंदाराम शेळके, सरपंच, मानोरी बुद्रुक. (०८ मानोरी)

Template

Image Attachment

Photo Manager

Social Media

Metadata

Attach Document

Translate

Backup

Agency

QrCode

Attch Audio/Video

080921\113508nsk_27_08092021_13.jpg

मानोरीतील रस्त्यांची मुसळधार पावसामुळे दुदर्शा