शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

लष्करी हद्दीतील रस्ते होणार खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:46 AM

लष्कराने सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेले रस्ते पुन्हा वाहतुकीस खुले करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा ठराव करण्यात आल्याने लष्करी हद्दीतील रस्ते स्थानिक नागरिकांसाठी खुले होणार आहेत.

देवळाली कॅम्प : लष्कराने सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेले रस्ते पुन्हा वाहतुकीस खुले करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा ठराव करण्यात आल्याने लष्करी हद्दीतील रस्ते स्थानिक नागरिकांसाठी खुले होणार आहेत. याशिवाय नागरिकांच्या निगडित असलेले महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची बैठक अध्यक्ष ब्रिगे. पी. रमेश हे अनुपस्थित असल्याने उपाध्यक्ष भगवान कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत लष्करी हद्दीलगत शंभर मीटरपर्यंत बांधकाम न करणे व पाचशे मीटरपर्यंत तीन मजली बांधकामास परवानगी याबाबत संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या आदेशातील १०९ शहरांच्या यादीत देवळाली कॅम्पचा समावेश नसल्याने रखडलेल्या १२ बांधकाम आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. तत्पूर्वी बांधकाम आराखडे व रस्ते खुले करण्याबाबत बोर्ड अध्यक्षांनी दूरध्वनीवरून सूचना दिल्या. मात्र कॅन्टोन्मेंट कायदा २००६ मधील कलम २३८(६) मधील तरतुदीनुसार असे बांधकाम आराखडे थांबवू शकत नाही. यामुळे बोर्डाने मंजुरीचा विषय घेतला.खासदार हेमंत गोडसे यांनी दिलेल्या पत्रानुसार भगूर-नानेगाव रस्ता हा ९ मीटर करण्याकामी ‘ए-वन’ लॅन्डमधून ‘सी लॅन्ड’ वर्ग करण्याची मागणी केली होती. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत सूचना आल्या असता बोर्डाने तसा ठराव पारित केला. तो संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. बोर्डाच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेल्या निविदेपैकी आकाश एंटरप्रायजेसची निविदा मंजूर करताना दररोज ४० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार असून, त्यासाठी ७.६५ लाख रुपये प्रति महिला खर्च अपेक्षित आहे. या कामी भगूर नगरपालिका व विविध ग्रामपंचायतींना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती उपाध्यक्ष कटारिया यांनी दिली.बैठकीस नगरसेवक प्रभावती धिवरे, सचिन ठाकरे, आशा गोडसे, दिनकर आढाव, कावेरी कासार, बाबूराव मोजाड, मीना करंजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार आदी उपस्थित होते, तर लष्करनियुक्त ब्रिगे. शक्तिवर्धन, लेफ्ट. कर्नल अजय कुमार, कर्नल अतुल बिष्ट, कर्नल कमलेश चौहान, विंग कमांडर जसमित सिंग व उपजिल्हाधिकारी भगवान डोईफोडे हे गैरहजर होते.लष्करी हद्दीतील रस्ते नागरी वापरासाठी डिफेन्स इस्टेट विभागाचे प्रमुख महासंचालक यांनी विचारणा केल्यानुसार कॅन्टोन्मेंट कायदा कलम २५८ प्रमाणे ते रस्ते वापरास मिळावे, असा ठराव केला असता लोकल मिलिटरी अथॉरिटीने त्याची अंमलबजावणी न केल्याने बोर्ड सदस्यांनी याबाबत आवाज उठवला होता. याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशान्वये कार्यवाही होणे अपेक्षित असल्याने बंद केलेले रस्ते खुले करण्याचा ठराव पारित करण्यात आला. बंद असलेल्या नऊ रस्त्यावरील बॅरिकेड््स हटविणे आवश्यक झाले आहे.रस्ते डांबरीकरणाबाबत अनिश्चितताकॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत भुयारी गटारी झाली त्या ६३ किमीचा रस्ता डांबरीकरण होण्याबाबत अनिश्चितता असून, ज्या वेळेस टेंडर काढले होते त्यावेळी जीएसटी कर अस्तित्वात नव्हता आता मात्र आहे. तांत्रिकदृष्ट्या खोदलेला रस्ता डांबरीकरण नियममात्र असलातरी वाढीव टॅक्सच्या मुद्द्यामुळे खोदलेला रस्ता डांबरीकरण ठेकेदार करणार का नाही हे मात्र निश्चित नाही.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक