नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा व नायगाव खोºयातील गावांसाठी महत्वाचा असलेल्या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे व खोलवर गेलेल्या साईडपट्यांमुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे.सिन्नर - सायखेडा या २४ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील जायगाव ते सिन्नर या ११ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे-छोटे असंख्य खड्डे पडले आहे. काही ठिकाणी तर संपूर्ण रस्ताच खड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे वाहन चालकांबरोबर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच या संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही साईडच्या साईडपट्याही खोलवर गेल्या आहे.रस्त्यावरील खड्डे व खोलवर गेलेल्या साईडपट्यांमुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे. रस्ता अरु ंद असल्यामुळे दोन वाहन पास होतांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. या खडतर रस्त्यावर अपघातांच्याघटनांबरोबर अनेकदा वाहन चालकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहे. अशा या अपघात प्रवण बनलेल्या रस्त्याची व साईडपट्यांची संबंधित खात्याने लवकरात लवकर दुरूस्ती करण्याची मागणी नायगाव खो-यातील वाहन चालक, प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे.जायगाव ते सिन्नर या रस्त्याच्या बºयाचशा अंतराचे वर्षभरापुर्वीच नव्याने डांबरीकरण झाले आहे. आणि याच कामाचे वर्षभरात तीन-तेरा वाजले आहे. त्यामुळे या कामाचीच खोºयात चर्चा व संताप व्यक्त होत आहे.(फोटो २४ नायगाव)सिन्नर - नायगाव - सायखेडा या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्यांना वाचवण्यासाठी वाहन चालकांना अशाप्रकारे कसरत करावी लागत आहे.
नायगाव खोऱ्यातील रस्त्यांची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 5:24 PM
नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा व नायगाव खोºयातील गावांसाठी महत्वाचा असलेल्या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे व खोलवर गेलेल्या साईडपट्यांमुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे.
ठळक मुद्देखड्डे अन् साईडपट्या खराब झाल्याने वाहतुकी अडथळे