लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुलभूत सोयीसुविधांचा नेहमीच बोजवारा ज्या भागात उडालेला दिसतो, त्या वडाळागावातील अंतर्गत रस्ते दुरु स्तीचे काम मनपाने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चार मिहन्यांपूर्वी हाती घेतले. रस्ते काँक्र ीटीकरण करण्यासाठी सरसकट गल्ली-बोळासह अंतर्गत वापराचे रस्ते खोदण्यात येऊन डांबरीकरण उध्वस्त केले गेले; परिणामी सध्यस्थीतीत गावात रस्ते केवळ नावाला उरले असून सर्वत्र चिखलामुळे बजबजपुरी निर्माण झाली आहे.रस्ते विकासाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. वडाळा गावातील रस्त्यांची अवस्था मागील चार मिहन्यांपासून कायम आहे वडाळ्यातील सर्वत अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रि टीकरण चे काम महापालिकेने मंजूर केले हे काम सुरू होण्याअगोदर त्याचे नियोजन अत्यंत ढिसाळ पद्धतीने झाल्यामुळे वडाळा गावातील सर्वच रस्त्यांची दैनावस्था झाली आहे परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे फळातील रस्ते काँग्रेस करण्याचे काम हाती घेण्यात आले असते तरीदेखील या कामांमध्ये ताळमेळ नियोजन नसल्याने संताप व्यक्त होत आहे गावातील प्रत्येक रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे मात्र काँक्रि टीकरण याकडे दुर्लक्ष केले गेले सरसकट सगळे रस्ते अगोदर भरून ठेवले गेले आण िपावसाच्या रीपी मुळे सर्वच रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले सुरु वातीला खोदलेल्या रस्त्यांवर मुरु माची मलमपट्टी करण्यात आली आण िखड्डे बुजविण्याचा प्रयत्न झाला; मात्र हा प्रयत्न पावसाने पूर्णपणे फोल ठरवीला; परिणामी गावातील सद्यस्थितीत सगळे रस्ते चिखलाखाली गेलेले आहे एकही रस्त्याचे काँक्रि टीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. रस्ते खोदकाम करताना भुयारी गटार दुरु स्ती, जलवाहिन्यांची दुरु स्ती,आदी कामेदेखील हाती घेण्यात आले; मात्र या कामामुळे मूळ काँक्रि टीकरण रखडले. परिणामी रस्त्याची दैनावस्था वाढीस लागली. सार्वजनिक बांधकाम, भुयारी गटार, पाणीपुरवठा अशा तीन वेगवेगळ्या विभागांची कामे सुरु असल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या या विभागांमध्ये देखील आपापसांत ताळमेळ नसल्याने या कामांचा खोळंबा होताना दिसून येत आहे. अत्यंत संथगतीने होत असलेल्या या कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आण िपावसाळ्याच्या तोंडावर हा त्रास अधिकच वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांना परिसरातून ये-जा करताना अक्षरक्ष: चिखल तुडवत जावे लागत असून खड्ड्यांमधून मार्गक्र मण करत वाट शोधावी लागत आहे. यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या गलथान कारभार याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे काँक्रि टीकरण झाल्यानंतर नागरिकांना या त्रासातून मुक्तता मिळणार आहे मात्र त्यापूर्वी नियोजनशून्य कामामुळे अधिक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. -इन्फो— काँक्र ीटीकरणाचे नियोजन फसले महापालिका प्रशासनाने ज्या रस्त्यांचे खोदकाम केलेले आहे ते रस्ते तत्काळ काँक्रि टीकरण करावे अशी मागणी होत आहे. संबंधित ठेकेदाराकडून रस्त्यांचे कॉंक्रि टीकरण करण्यापूर्वी योग्यपणे नियोजन करणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. सर्वच भागातील रस्ते एकापाठोपाठ खोदण्यात आले आण िकाँक्र ीटीकरणाला मात्र सुरु वात केली गेली नाही, त्यामुळे रस्त्यांची अधिक दुर्दशा झाली. गेल्या चार मिहन्यांपासून वडाळा गावातील रस्ते दुरु स्तीचे घोंगडे भिजत पडले असून अत्यंत कासवगतीने सुरू असलेल्या या दुरु स्तीच्या कामामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अगोदर भुयारी गटारकामामुळे दुर्दशा चार मिहन्यांपूर्वी वडाळा गावातील वडाळा चौफुली ते थेट पांढरी देवी चौकापर्यंत मुख्य रस्त्यावर भुयारी गटारी चे काम करण्यात आले यामुळे हा संपूर्ण रस्ता खोदण्यात आला यानंतर महापालिकेने केवळ मलमपट्टी करून वेळ मारून नेली या रस्त्याची देखील काँक्रि टीकरण करण्यात येणार असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले गेले गावातील हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे तरीदेखील या रस्त्याची दुरावस्था थांबविण्यात मनपा प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही याचं रस्त्यावरील चांदशावली बाबा दर्ग्यासमोर अक्षरश: खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अपघातांना निमंत्रण मिळत आहे पावसाचे पाण्याचे तळे या ठिकाणी साचत असल्याने सखल भागातून पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्याची अधिकच दुर्दशा झाली. या भागातील अंतर्गत रस्ते उध्वस्त गावातील खोडे गल्ली, मनपा शाळा परिसर, संजरी मार्ग, कोळीवाडा, माळी गल्ली, तलाठी कार्यालयाच्या मागील परिसर, गोपाळवाडी, रजा चौक खंडेराव महाराज चौक, सिद्ध हनुमान मंदिर परिसर वडाळ चौफुलीजवळील परिसर खंडेराव महाराज मंदिर ते पांढरी देवी चौकापर्यंतचा रस्ता खोदल्याने दुरावस्था झालेली आहे. या सर्व भागांमधील रस्त्यांचे काँक्रि टीकरण करण्यात येणार आहे मात्र गेल्या तीन मिहन्यांपासून या भागातील रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे सरसकट रस्ते खोदण्यात ऐवजी एक एक रस्ता खोदून त्याचे काँक्रि टीकरण मार्गी लावणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही दुर्दैवाने गावातील सगळ्याच रस्त्यांची वाट लागली.चेंबर बांधणी रखडलेली भुयारी गटारी चे काम मार्गी लागले असले तरी या गटारीच्या चेंबरबांधणीचे काम रखडलेले दिसते. संजरी मार्ग, खोडे गल्ली या भागातील चेंबर दुरु स्ती करून ते बांधण्यात आले आहे; मात्र मनपा शाळेकडे जाणार्या रस्त्यावरील चेंबर आद्यप जैसे-थे आहे. गोपालवाडी रस्ता, हनुमान मंदिरामिगल तहूरापार्ककडे जाणारा रस्ता, तलाठी कर्यालयामिगल रस्त्यांच्या परिसरात चेंबरवर केवळ ढापे ठेवून वेळ मारून नेण्यात आली आहे. चेंबरची दुरु स्ती करून मजबुतीकरण करण्यात आलेले नाही.
वडाळागावातील रस्ते उरले नावापुरते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:32 PM
नाशिक : मुलभूत सोयीसुविधांचा नेहमीच बोजवारा ज्या भागात उडालेला दिसतो, त्या वडाळागावातील अंतर्गत रस्ते दुरु स्तीचे काम मनपाने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चार मिहन्यांपूर्वी हाती घेतले. रस्ते काँक्र ीटीकरण करण्यासाठी सरसकट गल्ली-बोळासह अंतर्गत वापराचे रस्ते खोदण्यात येऊन डांबरीकरण उध्वस्त केले गेले; परिणामी सध्यस्थीतीत गावात रस्ते केवळ नावाला उरले असून सर्वत्र चिखलामुळे बजबजपुरी निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देनियोजनशून्य : खोदकामामुळे सर्वत्र बजबजपुरी; संथगतीमुळे नागरिकांत संताप