कळवण : शेतमालाला भाव नाही, सर्वच बाजूंनी होणारी फसवणूक,कांदा भावात सातत्याने होणारी घसरण यामुळे अस्वस्थ बनलेल्या शेतक-यांनी बुधवारी (दि.२८)रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आपल्यातील अंसतोषाला वाट मोकळी करुन दिली. येथील कांदा लिलाव बंद करु न संतप्त शेतकरी बांधवांनी कळवणच्या एस. टी. बस स्थानकाजवळ सुमारे तासभर रस्ता रोको आंदोलन करु न शासन व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले.शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविंद्र देवरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे , किसान सभेचे तालुका सरचिटणीस मोहन जाधव , शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पोपट पवार , रायुकॉचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांनी तासभर ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले. केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करु न कांदाला हमी भाव द्यावा व कळवण तालुका दुष्काळी जाहीर करा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, बुधवारी कळवणचा आठवडे बाजार असल्याने बस स्थानकाजवळ तासभर रस्ता रोको आंदोलन सुरु झाल्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. कळवण - देवळा व कळवण - नाशिक रस्त्यावर वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या.मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारासरकारने कांद्याला हमी भाव द्यावा आणि कळवण तालुका दुष्काळी जाहीर करावा अन्यथा दि. २ डिसेंबर रोजी नांदूरी येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित कार्यक्र म उधळून लावण्याचा व मंत्री, खासदार व आमदारांना तालुक्यात पाय न ठेवू देण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी रस्ता रोको आंदोलनप्रसंगी दिला.मुंगसेला ठिय्या आंदोलनकृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे उपबाजार समितीत कांदा उत्पादकांना कांदा विक्रीचे रोख पैसे मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतक-यांनी कृउबाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून ठिय्या आंदोलन केले. मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावर कांदा उत्पादक शेतकºयांना लिलावानंतर केवळ ५० टक्के रक्कम दिली जाते व उर्वरित ५० टक्के रकमेची कुठलीही हमी दिली जात नाही. शासन निर्णयानुसार कांदा उत्पादकांना रोखीने पैसे देणे गरजेचे आहे.
कळवणला कांदा उत्पादक शेतक-यांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 5:03 PM
कांदा भावात घसरण : हमी भाव देण्याची मागणी
ठळक मुद्देकळवणच्या एस. टी. बस स्थानकाजवळ सुमारे तासभर रस्ता रोको आंदोलन करु न शासन व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले.