मालेगाव मध्य : शहरालगतच्या दरेगाव शिवारातील महामार्गावरील मड्डे हॉटेलसमोर पहाटे पाच वाजता तवेरा गाडीतुन आलेल्या दरोडेखोरांकडून आयशर अडवुन चालकांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकून रोख व दोन मोबाईल असा ११ हजार ३०० रु पयांसह औषध माल घेऊन पोबारा केला.याप्रकरणी आयशर चालक मोहसीन खान हाफिज खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवार वाडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महामार्गावरील व्यवसायीकांमध्ये घबराट पसरली आहे. आयशरक्र ं.एम.पी.१३ जी.ए. ७७४८ भिवंडीहुन इंदौरला औषध माल घेऊन जात असतांना महामार्गावरील दरेगावपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेल मड्डे समोर बुधवार (१२) पहाटे पाच वाजता फिक्कट रंगाची तवेरा गाडीतुन आलेल्या सात अज्ञात इसमांनी आयशर गाडी आडविली.आयशर चालक मोहसीन खान हाफिज खान (३५) रा.धामनोद ता.धरमपुरी जिल्हा धार (मध्य प्रदेश) याला बंदुकीचा धाक दाखवून व शिवीगाळ करून त्याच्या खिशातून दोन हजार ५००रु पये रोख, सहचालक पुस्पेंद्र तिवारी याच्या खिशातून ८०० रु पये रोख, आठ हजार रु पये किंमतीची दोन मोबाईल फोन असा एकुण ११ हजार ३०० रु पयांच्या ऐवजासह गाडीतील औषधी माल घेऊन पोबारा केला. दरोडेखोरांनी दोन्ही चालकांच्या चेहऱ्यावर व हात कापडाने बांधुन पळ काढला. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात दुपारी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीतील किती किंमतीचीऔषधी माल लुटण्यात आला हे अजुन स्पष्ट झालेली नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील करीत आहे.
बंदुकीचा धाक दाखवून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 1:03 PM