इगतपुरी : कसारा घाटात बंद पडलेल्या ट्रक चालकास शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना अर्ध्या तासाच्या थरारनाट्यानंतर एकास पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. नाशिकहून मुंबईकडे लोखंडी प्लेट घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एम एच ४० बीजी ६१६५) हा रात्रीच्या सुमारास नवीन कसारा घाट उतरत असताना गाडीचा पाटा तुटला. त्यामुळे महामार्ग पोलिसांच्या मदतीने रात्रीच्या वेळी सदर ट्रक रस्त्याच्या बाजूला लावून ठेवण्यात आला. रात्रीच्या वेळी गॅरेज उपलब्ध होत असल्याने ट्रक चालकास महामार्ग पोलिसांनी मोबाइल नंबर दिला व पोलीसगस्तीसाठी निघून गेले.पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास ट्रकजवळ मोटारसायकलवरून तिघे जण आले. पूर्ण काळे कपडे परिधान केलेल्या या ३ तरुणांनी गाडीतील चालकास आवाज देत उठवले व दादागिरी करीत ट्रकवर दगडफेक केली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखीत महामार्ग पोलिसांना फोन केला. तोपर्यंत या ३ तरुणांनी ट्रकमध्ये चढून ट्रक चालक विकी खोब्रागडे व क्लीनर निधी वासनिक यांना बेदम मारहाण केली व त्यांच्या कडील रोख रक्कम व मोबाइल हिसकावून घेतला. त्याचदरम्यान महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे माधव पवार, मुरलीधर गायकवाड, दीपक दिंडे व संजय नंदन हे तिथे पोहोचले. पोलीस आल्याचे समजताच लुटारूंनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न करीत जंगलात पळ काढला. याचदरम्यान तिघांपैकी मुख्य सूत्रधार असलेल्या विजय रामदास ढमाळे, रा. इगतपुरी याला पोलिसांनी फिल्मी स्टाइलने पाठलाग करीत पकडले. पोलीस हवालदार मुरलीधर गायकवाड यांनी त्याला पकडून ठेवल्याने दरोडेखोर विजय ढमाळे याने पोलीस कर्मचारी गायकवाड यांच्यावर धारधार हत्याराने हल्ला चढविला. त्यात ते जखमी झाले. त्याचदरम्यान अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद करीत ताब्यात घेतले व कसारा पोलिसांच्या हवाली केले. आरोपीकडे असलेली दुचाकी (क्रमांक एमएच १५ एचबी १०७५) देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.पोलीस पोलिसांच्या मदतीसाठी...दरम्यान, कसारा घाटात धारदार शस्त्र घेऊन लुटमार करणारी टोळी वाहनचालकांना दादागिरी व मारहाण करीत असून महामार्ग पोलिसांवरसुद्धा दगडफेक करीत असल्याची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलमान खतीब व पोलीस कर्मचारी, तसेच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्यदेखील मदतीला पोहोचले
कसारा घाटात ट्रकचालकाला लुटणाऱ्या दरोडेखोराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2022 2:51 AM
कसारा घाटात बंद पडलेल्या ट्रक चालकास शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना अर्ध्या तासाच्या थरारनाट्यानंतर एकास पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
ठळक मुद्देथरारनाट्य : एक पोलीस कर्मचारी जखमी; दोन जण फरार