नाशिक : तालुका पोलीस ठाणे हद्दीतील विल्होळी शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरूननाशिक बाजूने मुंबईकडे औषधसाठा वाहून नेणारा ट्रक चोरट्यांनी लुटल्याची घटना रविवारी (दि.२२) घडली. चालकाला बेदम मारहाण करत लुटारूंच्या टोळीने औषधांनी भरलेला ट्रक (एम.एच ०४ सीए ७७६४) पळवून नेला. याप्रकरणी चालकाने वाडीव-हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरटे हा ट्रक गिरणारेमार्गे मुंगसरा-दरी-मातोरी रस्त्याने पुढे पेठरोडकडे घेऊन जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक मुंगसरा शिवारातील एका शेताच्या बांधावर जाऊन उलटला.याबाबत मिळालेली माहिती अशी, नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची गस्तदेखील थंडावल्याचे बोलले जात आहे. मागील दोन दिवसांपासून औषधसाठ्याने भरलेला ट्रक मुंगसºयातील एका शेताच्या बांधावर जाऊन उलटला; मात्र त्याबाबत पोलिसांना सोमवारी (दि.२३) सकाळी येथील काही रहिवाशांनी कळविल्यानंतर निदर्शनास आले. हा ट्रक याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विल्होळी शिवारातून रविवारी मध्यरात्री लूटारूंच्या टोळीने महामार्गावरून चालकाला बेदम मारहाण करत गावठी पिस्तूलचा धाक दाखवून पळवून नेला होता. याबाबत चालकाने तालुका पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दिली; मात्र या गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलिसांकडून फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही. हा ट्रक पेठ रस्त्याच्या दिशेने जाताना लूटारूंपैकी चो कोणी चालक चालवित होता त्याच्या नियंत्रणातून सुटल्याने उलटला. अपघातानंतर लूटारू घटनास्थळावरून फरार झाले. जर अपघात घडला नसता तर या ट्रकचा पोलिसांनी थांगपत्तादेखील लागला नसता, असे नागरिकांनी बोलून दाखविले. लाखो रूपये किंमतीचा औषधसाठा असलेला रात्रीपासून रस्त्याच्याकडेला अपघातग्रस्त स्थितीत बेवारसपणे पडून असल्याने नागरिकांचा संशय बळावला. अपघात होऊन अद्याप या ट्रकबाबत कुठलाही पंचनामा करण्यासाठी पोलीस अजून कसे आले नाहीत? असा प्रश्न नागरिकांना पडला. त्यामुळे जागरूक शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती थेट ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर तालुका पोलीस खडबडून जागे झाले आणि सोमवारी सकाळी त्यांनी घटनास्थळ गाठले.
महामार्गावरून चोरट्यांनी लुटलेला ट्रक मुंगसऱ्यात उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 3:28 PM
चालकाने तालुका पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दिली; मात्र या गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलिसांकडून फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही. हा ट्रक पेठ रस्त्याच्या दिशेने जाताना लूटारूंपैकी चो कोणी चालक चालवित होता त्याच्या नियंत्रणातून सुटल्याने उलटला.
ठळक मुद्देअपघातानंतर लूटारू घटनास्थळावरून फरार झालेजर अपघात घडला नसता तर या ट्रकचा थांगपत्तादेखील लागला नसता