नाशिकरोड : हावडा - मुंबई मेलमध्ये बुधवारी मध्यरात्री चाळीसगाव-मनमाड दरम्यान पाच जणांच्या टोळक्याने प्रवाशांना शिवीगाळ व मारहाण करत सुमारे साडेसात हजारांची लूट करण्यात आल्याची घटना घडली. लुटारूंपैकी दोघांची नाशिकरोड व एकाची इगतपुरी रेल्वेस्थानकांवर रेल्वेसुरक्षा दलाच्या जवानांनी मुसक्या आवळल्या.हावडा येथून मुंबईला जाणारी हावडा मेल ही बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजेनंतर चाळीसगाव रेल्वेस्थानक सोडल्यानंतर पाठीमागील एका सर्वसाधारण डब्यात पाच जणांच्या टोळक्याने धुडगूस घालण्यास सुरुवात केली. थंडीमुळे सर्व दारे-खिडक्या बंद करून प्रवासी झोपेत असताना या टोळक्याने प्रवाशांना शिवीगाळ-मारहाण करत दहशत निर्माण केली.अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रवासी व विशेषत: महिला, मुले प्रचंड घाबरून गेली होती. पाचही लुटारूंनी प्रवासी व महिलांजवळील मोबाइल, पैसे बळजबरीने काढून घेतले. काही वेळातच रेल्वे मनमाड रेल्वेस्थानकवर आल्यानंतर टोळक्याच्या दहशतीमुळे त्या डब्यातून मनमडाला कोणी उतरले नाही. मात्र त्यानंतर रात्री २.३० वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लाटफॉर्म क्रमांक ३ वर रेल्वे आल्यानंतर लुटारूंपैकी दोघे जण नाशिकरोडला उतरले, तर एक संशयित त्याच डब्यात बसून राहिला व इतर दोघे जण पुढील डब्यात निघून गेले. दोघांच्या मुसक्या आवळल्यानाशिकरोड रेल्वेस्थानकांवर गाडी थांबल्यानंतर दोघे जण उतरून पळून जात होते. यावेळी प्रवाशांचा ओरडण्याचा व महिलांचा रडण्याचा आवाज ऐकून प्लाटफॉर्म क्रमांक ३ वर बंदोबस्ताला असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान राजीवकुमार, विजय कुमार राय, महेश महाले, बलराम सिंह यांनी पळून जाणाऱ्यांचा पाठलाग करून जयेश सुखलाल कोकणी (२५), अमोल दिलीप बोरसे (२२) दोघे रा. धुळे यांना पकडले. ज्या प्रवाशांना लुटले होते त्यांनी नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात दरोड्याची माहिती दिली. एक संशयित त्याच डब्यात असल्याच्या माहितीवरून इगतपुरी रेल्वेस्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तिसरा संशयित गजानन संतोष वाकोडे (४२) रा. वाशिम अकोला याला ताब्यात घेतले, तर इतर दोघे साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाले. तिघा संशयितांनी दोन मोबाइल व रोकड असा एकूण ७ हजार ५५० रुपयांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो चाळीसगाव रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे. तिघा संशयितांनादेखील चाळीसगाव रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)एक संशयित त्याच डब्यात असल्याच्या माहितीवरून इगतपुरी रेल्वेस्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तिसरा संशयित गजानन संतोष वाकोडे (४२) रा. वाशिम, अकोला याला ताब्यात घेतले, तर इतर दोघे साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाले. तिघांनी मोबाइल व रोकड असा एकूण ७ हजार ५५० रुपयांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी नाशिकरोडला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो चाळीसगावला वर्ग केला आहे. तिघांना चाळीसगावला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हावडा-मुंबई एक्स्प्रेसमध्ये लूट
By admin | Published: December 23, 2016 1:20 AM