शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
2
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
3
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
4
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काका विरुद्ध पुतणी! गायत्री शिंगणे घड्याळ हातात बांधणार? अजित पवारांची घेतली भेट
6
कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार
7
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
9
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
10
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
11
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
12
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले
13
अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद 
14
VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी
15
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
17
IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीसाठी भारताची रणनीती ठरली? एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता
18
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
19
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

तोतया पोलिसांकडून इंदिरानगरमध्ये लूट

By admin | Published: November 22, 2015 10:58 PM

तोतया पोलिसांकडून इंदिरानगरमध्ये लूट

इंदिरानगर : ‘आम्ही पोलीस आहोत, पुढे जाऊ नका’, ‘तुमच्याजवळील मौल्यवान साहित्य पिशवीत काढून रुमालात बांधून आमच्याकडे द्या’, असे सांगत तोतया पोलिसांनी साठ हजार रुपये किमतीची तीन तोळे वजनाची सोन्याची साखळी लुटल्याची घटना इंदिरानगर परिसरात उघडकीस आली आहे. चांगदेव तुषार शिंदे (वय ५५, रा. पाटील गार्डन, इंदिरानगर) हे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता मर्चंट बँकेजवळून पायी जात होते. यावेळी दोन संशयित पल्सर मोटारसायकलवर आले. त्यांनी शिंदे यांच्याशी संवाद साधत भीती निर्माण करणारी माहिती दिली. यामुळे त्यांनी रु माल काढून त्यात गळ्यातील तीन तोळ्याच्या सोनसाखळीसह खिशातील भ्रमणध्वनी, रोख रक्कम ठेवून संशयिताकडे दिली. काही वेळाने संशयितांनी हातचलाखीने हा ऐवज घेत तो रु माल त्यांच्या पिशवीत टाकून दिला. घरी गेल्यावर शिंदे यांच्या सदर बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून संशयित लबाडांविरुद्ध तक्र ार दाखल केली आहे. लग्नास नकार दिल्याने तरुणीस मारहाण इंदिरानगर : मुलीने लग्नाची मागणी फेटाळल्याचा राग धरून संशयिताने मुलीस शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली. संशयित विशाल उर्फहरिश्चंद्र विजय मथुरे (रा. इंदिरानगर) याने एका मुलीला विवाह करण्याची मागणी घातली होती; मात्र मुलीने नकार दिल्याने मथुरे यांनी मनात राग धरून संबंधित मुलीचे आई-वडील व भाऊ यांना मारण्याची धमकी देत मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इसमाची आत्महत्त्यानाशिक : राहत्या घरी गळफास घेऊन इसमाने आत्महत्त्या केल्याची घटना सिडको येथे घडली. हेमराज बळीराम सपकाळे (वय ४२, रा. सप्तशृंगी चौक, पवननगर) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (वार्ताहर)