मनमाड : शहरातील गोरगरीब जनतेला गेल्या अनेक दिवसांपासून रॉकेल मिळत नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. रॉकेलच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन करण्यात आले.मनमाड हे कामगार वस्तीचे शहर असून, तळागाळातील जनतेला रेशन च्या रॉकेलवर अवलंबून राहावे लागते. गेल्या काही दिवसांपासून रेशनवर मिळणारे रॉकेल बंद करण्यात आले आहे. रॉकेलअभावी जनतेची मोठी गैरसोय होत आहे. काही वेळा अंत्यविधीसाठी रॉकेल न मिळाल्यास डिझेलचा वापर करावा लागतो. आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले. निवेदनावर रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर धिवर, तालुका अध्यक्ष कैलास अहिरे, रुपेश अहिरे, विलास अहिरे, गुरु कुमार निकाळे, सुरेश शिंदे, अनिल निरभवणे, महेंद्र वाघ, प्रदीप घुसळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. राजेंद्र अहिरे, ांगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
ंमनमाडला रॉकेलप्रश्नी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 1:39 AM