नाशिकरोड : महावितरणच्या सर्वसामान्य ग्राहकांच्या विद्युत संदर्भातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी विद्युत कायद्यानुसार त्रिसूत्री पद्धत तयार करण्यात आली असून यामध्ये परिमंडळनिहाय असलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मंचाने न्याय देताना कायद्यासोबत मानवी संवेदना जपून आपली भूमिका चोखपणे बजवावी असे प्रतिपादन महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांनी केले.एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र येथे महावितरणच्या ग्राहक तक्र ार निवारण मंचचे अध्यक्ष, सदस्य, सचिव व विधी अधिकारी यांच्याकरिता आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत काळम पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्युत लोकपाल दीपक लाड, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, मुख्य महाव्यवस्थापक भरत जाडकर, मुख्य विधी सल्लागार रमेश गांधी यांची उपस्थित होते.यावेळी बोलताना काळम पाटील म्हणाले की, मंडळ स्तरावरील अंतर्गत तक्रार निवारण कक्षाने सुद्धा ग्राहक तक्रारीचे निवारण गतीने करावे ग्राहकांच्या तक्रारी नीट समजून घेऊन दोन्ही बाजू विचारात घेताना संवेदना सुद्धा कायम ठेवल्या पाहिजे. मात्र भावनेच्या आहारी न जाता कंपनी व ग्राहक हित जोपासत न्याय करण्याचे आवाहन काळम पाटील यांनी केले.महावितरणमधील प्रत्येक घटकाने सदविवेक बुद्धीचा वापर करून न्याय द्यावा, तसेच ग्राहकाचे हित जोपासताना कंपनीचे नुकसान होणार नाही यामधील समन्वय साधण्याचे मत मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर यांनी व्यक्त केले.मुख्य विधी सल्लागार रमेश गांधी यांनी प्रास्ताविकातून पिहल्यांदाच अशा प्रकारची सर्व समावेशक कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून ग्राहकाला योग्य व तत्पर न्याय देण्यासाठी यंत्रणांचे समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विधी अधिकारी आपली भूमिका योग्यपणे बजावीत असून या कार्यशाळेतून मिळालेली माहिती उपस्थितांनी इतरांपर्यंत पोहचावी, असे आवाहन गांधी यांनी केले.कार्यशाळेला राज्यभरातील महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष, सदस्य, सचिव व विधी अधिकारी तसेच प्रशिक्षण केंद्राचे सहायक महाव्यवस्थापक पांडुरंग वेळापुरे, कार्यकारी अभियंते देवेंद्र सायनेकर, अनिल नागरे, नरेंद्र सोनवणे, भाऊसाहेब पाटील आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संगणकीय सादरीकरणाद्वारे माहितीविद्युत लोकपाल दीपक लाड यांनी, कार्यशाळेच्या माध्यमातून चांगला उपक्रम राबविला असून या माध्यमातून सर्वच घटक चांगली माहिती, विचार, कल्पना यांची आदान प्रदान होऊन सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर संगणकीय सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
ग्राहक तक्रार निवारण मंचची भूमिका महत्त्वपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:41 AM