नाशिक : महिलांबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये न्यायालयाबाहेर केल्या जाणाºया तडजोडी घातक असून महिलांविरुद्धचे गुन्हे व अत्याचारास पायबंद घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे़ मात्र, यासाठी पोलीस व न्यायव्यवस्था यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अॅड. आभा सिंग यांनी शनिवारी (दि़१०) व्यक्त केले. गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात महिला दिनानिमित्त महाराष्ट्र फेडरेशन आॅफ वुमन लॉयर्स या संघटनेतर्फे आयोजित‘स्त्री सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित’ या कार्यक्रमात सिंह बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल होणाºया देशांमध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे़ प्रतिवर्षी सात हजारांहून अधिक हुंडाबळी व २० हजारांहून अधिक खटले न्यायालयात दाखल होत असले तरी प्रत्यक्षात केवळ चार संशयितांना अटक होऊन शिक्षा होते़ उर्वरित प्रकरणांमध्ये सर्रास न्यायालयाबाहेर तडजोडी केल्या जातात़ विशेष म्हणजे यामध्ये बलात्कार, विनयभंगासारखे गुन्हेही परस्पर मिटविले जातात़ यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून, अशा प्रवृत्तींना वेळीच रोखणे गरजेच स्त्रिया व मुलांच्या समस्या, महिला वकिलांचे सक्षमीकरण, विधी साक्षरता आणि कायद्यातील सुधारणा याबाबत महाराष्ट्र फेडरेशन आॅफ वुमन लॉयर्स ही संस्था काम करीत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा प्रीती शहा यांनी सांगितले़ यावेळी नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांच्यासह महाराष्ट्रातील ज्येष्ठ महिला विधिज्ञांचा सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पुखराज बोरा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश कविता ठाकूर उपस्थित होत्या़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिक फेडरेशनच्या अध्यक्षा अॅड. नीलिमा वर्तक, उपाध्यक्षा अंजली पाटील, अॅड. वैशाली गुप्ते, कार्यकारिणी सदस्य अॅड. अपर्णा पाटील, रोटरीच्या अध्यक्षा सीमा पाचडे यांनी मेहनत घेतली़
न्यायव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची : आभा सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 1:12 AM
नाशिक : महिलांबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये न्यायालयाबाहेर केल्या जाणाºया तडजोडी घातक असून महिलांविरुद्धचे गुन्हे व अत्याचारास पायबंद घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे़
ठळक मुद्दे‘स्त्री सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित’ कार्यक्रमप्रवृत्तींना वेळीच रोखणे गरजेच