शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘वाहतूक सुरक्षा दूत’ची भूमिका तरुणाईने बजवावी : सिंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 6:38 PM

वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून ती समाजाचीदेखील आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचा आक डा भारताचा सर्वाधिक आहे. हा आकडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे

ठळक मुद्देरस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचा आकडा भारतात सर्वाधिक ‘यमदूत की जीवनदूत’ या पथनाट्याचे सादरीकरण ३०व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

नाशिक : तरुणाईने बेभान व बेजबाबदारपणे वाहने दामटविण्यापेक्षा एक आदर्श नागरिकाच्या भूमिकेतून ‘वाहतूक सुरक्षा दूत’म्हणून पुढे येण्याची गरज आहे तरच आपण आपल्या शहरासह देशातील रस्त्यांवर अपघातात होणाऱ्या तरुण-तरुणींचा मृत्यू टाळू शकतो, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी केले.हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सोमवारी (दि.४) नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर-ग्रामीण पोलीस,सार्वजनिक बांधकाम विभाग, शालेय शिक्षण विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने ३०व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा आकाशात फुगे सोडून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सिंगल प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस अधीक्षक संजय दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता हेमंत पगारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पी.जी.खोडसकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदी उपस्थित होते.वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून ती समाजाचीदेखील आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचा आक डा भारताचा सर्वाधिक आहे. हा आकडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे. शालेय विद्यार्थ्यांनी ‘छोटा पोलीस’ बनून वाहतूक नियमांबाबत जागरूकता आणावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘वाहतूक सुरक्षा दूत’ म्हणून भूमिका बजवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. याप्रसंगी शहरातील विविध शाळांचे स्काउट-गाईड, एनसीसीचे मिळून सुमारे ३ हजार विद्यार्थी व मोटार वाहन संघटनेचे पदाधिकारी, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, वितरक उपस्थित होते. ‘जीवनदूत’ या संकल्पेनूत रस्ता सुरक्षा अभियान पुढील आठवडाभर साजरा केला जाणार असल्याचे कळसकर यांनी प्रास्ताविकातून सांगितले.यमदूत की, जीवनदूत?रस्ता सुरक्षा सप्ताहच्या शुभारंभप्रसंगी डॉ. शैलेंद्र गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी ‘यमदूत की जीवनदूत’ या पथनाट्याचे सादरीकरण केले. या पथनाट्यातून वाहतूक नियमांचे पालन कसे गरजेचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, वाहतूक सुरक्षा काळाची गरज या विषयावर आधारित १२५०शालेय विद्यार्थ्यांनी कुंचल्यातून रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन याठिकाणी मांडण्यात आले होते. तसेच भुलतज्ज्ञ संघटनेच्या वतीने डॉ. प्रशांत देवरे, डॉ. राहूल भामरे, डॉ. सरला सोहनंदानी यांच्यासह आदिंनी अपघातसमयी अत्यवस्थ रुग्णांना रुग्णवाहिक ा पोहचेपर्यंत प्रथमोपचार कसे द्यावे, याचे प्रात्याक्षिक करुन दाखविले. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRto officeआरटीओ ऑफीसhighwayमहामार्ग