लोहोणेर : - गेल्या तीन दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या भिज पावसामुळे येथील रहिवाशी दत्तात्रेय माधवराव तिसगे यांच्या घराचे छत मंगळवारी सकाळी अचानक कोसळले मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याने तिसगे कुटूंबीयांनी मात्र सुटकेचा नि:श्वास टाकला आहे . माळी चौक परिसरात दत्तात्रेय तिसगे यांच्या मालकीचे घर आहे. यात त्यांचे लहान बंधू सुनील तिसगे हे सह कुटूंब राहतात. मंगळवारी सकाळी सात वाजता त्यांच्या घराच्या छताचा भाग अचानक कोसळला मात्र तिसगे कुटूंबीय जागे असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. लोहोणेर परिसरात गेल्या तीन दिवसापासून भिज पाऊस आपली हजेरी लावत असल्याने घराचा छताचा भाग कोसळला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत लोहोणेर येथील तलाठी पूरकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून या दुर्घटनेत छत ,पंखा, टीव्ही , धान्याची कोटी , स्टील कपाट आदी वस्तूचे नुकसानीसह सुमारे सत्तर हजाररु पयांचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे घराचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 2:38 PM