पिंपळगाव बसवंत : कारसूल, ता. निफाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेल्या आठ दिवसांपासून बंद होती. अखेर जि.प. कडून चार खोल्यांना मंजुरी दिल्यावर नवव्या दिवश्ी शाळेची घंटा वाजणार आहे. जिल्हा परिषदेने वर्ग खोल्याबाबत अभ्यास व कार्यवाही केल्यामुळे कारसूल येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहा दिवस वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतले, तरीही जि.प.च्या एकाही अधिकाऱ्याला जाग न आल्याने अखेर पालकांचा पाठिंब्याने शाळा अघोषित बंद केली. पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या शाळेची इमारत अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याने विद्यार्थी वर्गात बसण्यास घाबरत होते. जिल्हा परिषदेचा निष्काळजीपणा व आडमुठे धोरण दोन वर्षांपासून चालू होते. यामुळे शाळेची पटसंख्याही घटली होती. २०१ मुलांपैकी १०० मुले हे आजूबाजूच्या गावांमधून शिक्षणासाठी या शाळेत येत होती. २००४ ते २०१४ पर्यंत शाळेतील मुलांची ३४१ वरून २०१ संख्या झाली आहे. पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठविण्यास पालकांचा कौल कमी होत असून, केवळ प्रशासनाने दुर्लक्षांमुळे शिक्षणाचा दर्जा घसरण्याचे दिसून येत होते.
खोल्यांना मंजुरी मिळाल्यानंतर शाळा भरणार
By admin | Published: January 07, 2015 1:28 AM