नाशिक : पिकअप खरेदीसाठी माहेरहून पैसे न आणणाऱ्या पत्नीचा दोरीने गळा आवळत खून करणार्?या नराधम पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरु वारी (दि.१०) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कैलास गोपाळ चव्हाण (३२) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. ही घटना १२ मे २०१२ रोजी मध्यरात्री घडली.नाशिक : मालवाहू महिंद्र पीकअप जीप खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आणून दिले नाही, म्हणून पतीने चक्क पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना १२ मे २०१२ साली घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू होता. न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांअधारे आरोपी कैलास गोपाळ चव्हाण (रा.फुलेमंडई, जुने नाशिक ) यास दोषी धरत २६ हजार रूपयांचा दंडासह जन्मठेप सुनावली.याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी, राहत्या घरी कैलास याने पत्नी सुनिता कैलास चव्हाण (५०) यांच्याकडे माहेरहून पिकअप गाडी खरेदी करण्यासाठी ५० हजार रु पयांची मागणी केली. पैशांसाठी त्याने पत्नीचा छळ सुरू करत पत्नीला मारहाण करत दोरीने गळा आवळून ठार मारले होते. ज्या दोरीने सुनीताचा गळा आवळलाा ती दोरीदेखील आरोपी कैलासने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने लपवून ठेवली होती. याप्रकरणी सुनिताच्या भावाने कळवण पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरूध्द कायदेशीर फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी कैलासला अटक करत त्याच्याविरु द्ध पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. साक्षीदारांची साक्ष, गुन्ह्यात वापरलेली दोरी, परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे कैलासला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनीता नायर यांनी आरोपी कैलासला दोेषी धरले. त्यास खून केल्याप्रकरणी जन्मठेप व २६ हजार रु पये दंड तर व दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने डॉ. सुधीर कोतवाल यांनी बाजू मांडली. तपासी अधिकारी म्हणून उपनिरिक्षक सोनवणे तर पैरवी अधिकारी सहायक निरिक्षक आढाव यांनी कामकाज केले.
ज्या दोरीने पत्नीचा गळा आवळला त्याच दोरीमुळे मिळाली जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 7:46 PM
खून केल्याप्रकरणी जन्मठेप व २६ हजार रु पये दंड तर व दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
ठळक मुद्देखून केल्याची घटना १२ मे २०१२ साली घडली होती. दोरीदेखील आरोपी कैलासने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने लपवून ठेवली होती