शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

सभापतिपदासाठी होणार रस्सीखेच

By admin | Published: January 05, 2017 10:54 PM

चढाओढ : ताहाराबाद, वीरगाव, पठारे दिगरमध्ये चुरस

सटाणा : बागलाण पंचायत समितीचे सभापतिपद तसे गेल्या साडेबारा वर्षांपासून कायमस्वरूपी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून या पदावर महिलांचे राज असल्यामुळे अनुसूचित जमातीच्या पुरुषांना संधी मिळाली नाही. मात्र पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण सोडतीत सभापतिपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी खुले झाल्याने हे पद पटकावण्यासाठी ताहाराबाद, वीरगाव व पठावे दिगर गटामध्ये होणाऱ्या लढतीत रंगत वाढणार आहे.बागलाण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आदिवासी लोकसंख्येचा विचार करून इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण व पाठोपाठ बागलाण पंचायत समितीचे सभापतिपदही अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी कायमस्वरूपी राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी, सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्यांना उपसभापतिपदावर समाधान मानावे लागत आहे. खुल्या प्रवर्गातील रामकृष्ण अहिरे यांना शेवटचा सभापतिपदाचा बहुमान मिळाला होता. त्यानंतर हे पद जमातीसाठी राखीव झाल्याने आदर्श गाव चाप्याचा पाड्याचे माजी सरपंच कै. रामदास बागुल यांच्या रूपाने पहिला आदिवासी कोकणा समाजाच्या व्यक्तीला सभापतिपदाचा मान मिळाला. त्यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळाला. त्यानंतर सन २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉँग्रेसने पंचायत समितीवर सत्ता स्थापन करून राष्ट्रवादीच्या अलका माळी, विमल महाले यांना संधी मिळाली, तर उपसभापतिपदी कॉँग्रेसचे कै. श्यामकांत पवार व धर्मराज खैरनार यांना संधी दिली. या काळात दोन्ही कॉंग्रेसजवळ अनुसूचित जमातीचा पुरुष सदस्य नसल्यामुळे सभापतिपद आपोआप महिलांकडे चालत गेले, तर गेल्या पंचवार्षिकमध्ये पुन्हा महिलाराज आले. सुरुवातीला राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कॉँग्रेसने भाजपाशी घरोबा केला. आणि सत्तावाटपात भाजपाच्या वाट्याला सभापतिपद, तर कॉँग्रेसच्या वाट्याला उपसभापतिपद आले आणि भाजपाच्या गीता सोनवणे व विद्यमान जिजाबाई सोनवणे यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली. उपसभापतिपदी मायावती धिवरे विराजमान झाल्या. लोकसभा निवडणूक लागल्यानंतर कॉँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांना राष्ट्रवादीच्या मंडळीने पंचायत समितीमध्ये कॉँग्रेसने केलेली भाजपाबरोबरची युती तोडा अन्यथा आम्ही तटस्थ राहू, अशी भूमिका घेऊन एकप्रकारे कॉँग्रेसचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सदस्यांमध्ये धुसफूस निर्माण होऊन राष्ट्रवादीने तोडफोडीचे राजकारण करून उपसभापतिपद पदरात पाडून घेतले. (वार्ताहर)