मालेगाव : बुद्धांनी जगाला दिलेली सर्वात महत्त्वाची शिकवण आणि सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजे मैत्री. रोटरीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा कळस अशा शाश्वत मैत्रीतून जोपासला जात असल्याचे गौरवोद्गार कवी प्रा. अनंत राऊत यांनी काढले.
येथील रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या पदग्रहण समारंभात अग्रसेन भवनात राऊत बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दादा भुसे, माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, असिस्टंट गव्हर्नर दिलीप ठाकरे, मावळते अध्यक्ष राजेंद्र देवरे, सचिव केशव खैरनार, नूतन अध्यक्ष राजेंद्र दिघे, सचिव सुमित बच्छाव उपस्थित होते. मावळते अध्यक्ष देवरे व सचिव खैरनार यांनी दिघे व बच्छाव यांच्याकडे पदभार सोपविला.
नव्या पदाधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामकाज करण्याच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी राजेंद्र भामरे, दिलीप ठाकरे, दिघे यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन रोटरी सदस्य डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे, सुरेश शेलार, महेंद्र पाटील, सुनील पवार, उमाकांत देशमुख, भगीरथ सोनवणे यांना पिन प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक राजेंद्र देवरे यांनी तर केशव खैरनार यांनी अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन राजेंद्र अहिरे, उदय राहुडे यांनी केले. परिचय सतीश कलंत्री, डॉ. अनिल सावळे, राजाराम पवार, ॲड. रमेश मोरे यांनी करून दिला. यावेळी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे, राकेश डिडवानिया, सचिन शहा, विलास सोनजे, अजय बच्छाव उपस्थित होते. आभार बच्छाव यांनी मानले.
------------------------
रोटरी क्लब मालेगाव मिडटाऊनचा पदभार नूतन अध्यक्ष राजेंद्र दिघे, सचिव सुमित बच्छाव यांच्याकडे सुपुर्द करताना मावळते अध्यक्ष राजेंद्र देवरे, केशव खैरनार, मंचावर कृषिमंत्री दादा भुसे, कवी अनंत राऊत, राजेंद्र भामरे, दिलीप ठाकरे आदी. (३० मालेगाव रोटरी)
===Photopath===
300621\30nsk_12_30062021_13.jpg
===Caption===
३० मालेगाव रोटरी