खामखेडा : देवळा तालुक्यातील सावकी येथे केवळ चार ते पाच रु पये प्रति किलो भाव मिळत भाव मिळत असल्यामुळे एका शेतकऱ्याने शेतातील एक एकरांतील मुळा पिकावर रोटाव्हेटर फिरविले.बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक मोठयÞा प्रमाणात वाढल्याने भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत आहे. काबाडकष्ट करूनही शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने केलेला खर्चही निघणेही अवघड झाले आहे. तर काही वेळेस भाजी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असल्याने बोरसे यांनी अखेर मुळ्याच्या शेतात रोटाव्हेटर फिरवत पीक नष्ट केले.चालू वर्षी कांद्याचे बियाणे शेतकºयाने दोन वेळेस उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकले .परंतु ते परतीच्या व अवकाळी पावसामुळे वाया गेल्यामुळे कांद्याची लागवड करता आली नाही. तसेच मागे काही दिवसापूर्वी कांद्याला चांगला भाव असल्याने हॉटेल किंवा घरगुती स्वयंपाक घरातून कांदा गायब झाला होता. यालाच पर्यायी म्हणून हॉटेल व घरघुती जेवणात कांद्या ऐवजी मुळ्याचा वापर वाढला होता. त्यामुळे मुळ्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. बहुतांश शेतकºयांनी मुळ्याला भाव मिळेल या आशेने मुळा पिकाची लागवड केली होती.परंतु कांद्याचे भाव स्वस्त झाल्याने मुळ्याची मागणी घटली. मुळ्याला चार ते पाच रु पये प्रति किलो भाव मिळत असल्यामुळे मुळ्याच्या लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे मुश्किल झाले असल्याने किमान शेतात खत होईल, या उद्देशाने बोरसे यांनी या पिकावर रोटाव्हेटर फिरवत पीक नष्ट केले.
मुळा पिकावर फिरविला रोटाव्हेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 4:43 PM