लोहोणेर : देवळा येथील शेतकºयाने लाखो रु पये खर्च करून बांधली पॉली हाउस बांधत त्यात रंगीत सिमला मिरची लावली. परंतु संचारबंदीमुळे निर्यात बंद झाल्यामुळे संतप्त शेतकºयाने पिवळ्या व गुलाबी मिरचीवर फिरवला रोटर फिरविला. त्यामुळे लाखोचे आर्थिक नूकसान झाले आहे.देवळा येथील प्रगतीशील शेतकरी चिंतामण बळीराम आहेर या अभियंता असलेल्या शेतकºयाने कारखान्याच्या नोकरीला तिलांजली देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून २० लाखाचे कर्ज काढून २० गुठ्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाँलि हाउसची उभारणी करु न ,शेकडो कि. मी. वरून लालमाती व इतर निविष्टाचा वापर करत पहिल्या वर्षी नामदारी जातीच्या रंगित.सिमला मिरचीची लागवड केली होती. त्यावर्षी आहेर यांना सुमारे पाच लाख रु पयांचे उत्पन्न मिळाले होते. मध्ये एक, दोन वर्ष ्वर्षन, दुष्काळामुळे फारशे उत्पन्न मिळाले नाही. गत वर्षी ही त्यांनी जैविक पद्धतीचा अवलंब करून सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करून २० गुठ्यांत १५ ,टन पिवळ्या व लाल मिरचीचे उत्पन्न घेतले होते. प्रति किलोला १५ ते १६ रु पये खर्च वजा जाता साधारणता ३५ ते ४० रु पये किलो प्रमाणे नफा मिळाला होता. गत वर्षाच्या चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळाल्यामुळे या वर्षी मोठ्या उत्साहात महागडे बी घेवुन ( ७ रु प्रमाणे) रोप तयार करून लावण्यात आली होती. या वर्षी वातावरण पुरक असल्या मुळे रंगीत सिमला मिरचीची वाढही चांगली झाली होती. बाहेर मागणी असल्यामुळे व पंचताराकीत हाँटेल व चायनिज फुड करीता मागणी असते. परंतु गत ४० -४५ दिवसा पासुन संचार बंदी व सर्व हाँटेल व्यवसाय बंद असल्या मुळे पाँली हाउस मध्ये तयार असलेली निर्यात क्षम मिरची खंराब होते आहे. संचार बंदी पूर्वी ६० ते ७० रूपये किलो प्रमाणे जागेवर विक्र ी होणारी मिरची आज मात्र लॉकडाउन मुळे फुकटही कोणी घेत नाही.
पिकांवर फिरविला रोटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 6:28 PM