लोहोणेर : कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करत असताना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कोबी, शेवगा पिकावर रोटर फिरवून संताप व्यक्त केला.संचारबंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पिकवून शहरवासीयांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा म्हणून देवळा, कळवण व इतर परिसरात लहान-मोठ्या शेतकºयांनी कोबी, टमाटे, मिरची, खरबूज, टरबूज, वांगी यांची लागवड केली आहे.गेल्या ४० ते ४५ दिवसांपासून लॉकडाउनमुळे कोणीही व्यापारी खरेदीसाठी इकडे फिरकत नसल्याकारणाने व खेड्यापाड्यासह तालुकास्तरावरील सर्व आठवडे बाजार बंद असल्याकारणाने, शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला विकावा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोबी, शेवगा, मिरची, टमाटे, इत्यादी खराब होणारे पीक असल्याने ते तोडून नेणे गरजेचे आहे. परंतु बाहेर मागणी जरी असली तरी तो माल खुडून विक्रीसाठी व्यापारी खरेदी करण्यासाठी येत नाहीत.--------------------शेतातच पीक खराबदेवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील माजी सैनिक दीपक झाल्टे यांनी आपल्या शेतातील ३० गुंठे तयार कोबी पिकावर भाव मिळत नसल्यानेरोटर फिरवला असून, शासनाने भाजीपाला, फळे विक्र ीसाठी पुढाकार घेऊन यंत्रणा उभी करून आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच वर्षभर पाणी घालून तयार केलेले शेवगा पीक बुडासकट तोडले आहे. दुसरीकडे टरबूज, खरबूज या फळांना एप्रिल-मे महिन्यात मोठी मागणी असते. रमजान व अक्षय्यतृतीया या धार्मिक सणाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर खप असल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात या फळांची लागवड केली आहे. परंतु संचारबंदी असल्यामुळे मालेगावसह नाशिक, सुरत, अहमदाबादकडचे व्यापारी देवळा तालुक्यात खरेदीसाठी फिरकत नसल्याकारणाने शेतकºयाची फळं शेतातच खराब होत आहेत. थोड्या प्रमाणात शेतकरी हात विक्र ीने गावोगाव व तालुकास्तरावर विकण्यास नेताना दिसत आहे.
कोबी, शेवगा पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला रोटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 9:50 PM