सध्या सर्वत्र पाऊस नाही व पिकांची अवस्था बिकट आहे व हातात येणारे पिके वाया गेल्यात जमा आहेत. त्यातच जेमतेम पाण्यावर घेतलेल्या टोमॅटो, कांदा, कोबी , कोथिंबिर, मेथी, मिरची यासारख्या प्रमुख भाजीपाला शेतमालाला कवडीमोल बाजार भाव मिळत असल्यामुळे शेतकºयाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. शेतीच्या उत्पन्नावर मुलांचे लग्न, शिक्षण, आजारपण इतर सर्व जबाबदारी अवलंबुन आहे त्यातच मुलीचे लग्न व कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरीवर्ग सापडला आहेपावसाअभावी पिके वाळू लागले असून वाढही खुंटली आहे. हातात येणारे पिक वाया गेले आहे. अपेक्षेने साठवलेला कांदा चाळीत सडत आहे. कोबी पिकावर खर्चही सुटत नसल्याने तळवाडे येथील देविदास पवार या शेतकºयाने ट्रॅक्टरच्या साहाय्याने एक एकर कोबी पिकावर रोटर फिरविला आहे.
एक एकर कोबी पिकावर फिरविला रोटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 7:19 PM