उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सोमनाथ गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जेलरोड, नारायणबापू चौकात रस्त्याच्या कडेला संशयित शुभम मोरे हा त्याच्या मोबाईलमधील फनरेप ॲपच्या मदतीने रॉलेट नावाचा ऑनलाईन जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास नारायणबापू येथे रस्त्याच्या कडेला शुभम मोरे याला पकडून त्याची झडती घेऊन त्याचा मोबाईल तपासला असता, त्यातील फनरेप ॲपच्या मदतीने ऑनलाईन रॉलेट जुगार अड्डा तो चालवत असल्याचे उघडकीस आले. ग्राहकांकडून एक रुपयाला ३६ रुपये याप्रमाणे जुगार खेळण्यासाठी पैसे घेऊन संशयित यतिन बोरसे ऊर्फ प्रफुल्ल याच्याकडून आयडी व पासवर्ड घेऊन तो ग्राहकांना देऊन ऑनलाईन जुगार अड्डा चालवत होता. पोलिसांनी मोरेकडून दहा हजाराचा मोबाईल, पाचशे रुपये रोख असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘फनरेप’ ॲपवरून राॅलेटचा रंगलेला डाव उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:11 AM