नांदूरवैद्य : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) कामगार आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात कामगारांच्या विविध अडचणी तसेच कामगार धोरण याविषयीची चर्चा करण्यात आली.बैठकीत किमान वेतन तसेच कामगार विमा, भविष्य निर्वाह निधी आदी कामगारांच्या हितासाठी असलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन येत्या काही दिवसांत याबाबत मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडीचे अध्यक्ष सागर सोनवणे यांनी सांगितले. तसेच आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत उपाध्यक्ष अनिल पगारे, सचिव संदीप निकाळे, नाशिक जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडीचे अमोल पवार, प्रदेशाध्यक्ष तथा कामगार नेते प्रदीप कांबळे, प्रदेश सरचिटणीस गुणवंतराव नागटिळे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रदीप गंगावणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष अनिल गंगावणे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमित कडाळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संदेश साळवे, पुणे जिल्हाध्यक्ष नितीन कांबळे, पुणे शहराध्यक्ष रामभाऊ कर्वे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दुर्गा देवकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संदेश कांबळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, हवेली तालुका कार्याध्यक्ष परवेज शेख, वेल्हा तालुका अध्यक्ष अनिल सपकाळ, पुणे शहर कार्याध्यक्ष गौतम वानखेडे आदी उपस्थित होते.
कामगारांच्या प्रश्नांबाबत आरपीआयची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 7:12 PM
नांदूरवैद्य : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) कामगार आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात कामगारांच्या विविध अडचणी तसेच कामगार धोरण याविषयीची चर्चा करण्यात आली.
ठळक मुद्दे येत्या काही दिवसांत याबाबत मंत्रालयावर मोर्चा