कळवण : कळवण या १०० टक्के आदिवासी तालुक्यातील आदिवासी गावे, वाडी-वस्त्यांवरील ४१ कामांना ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत सभामंडप, अंतर्गत रस्ते, रस्ते काँक्रि टीकरण, रस्ते डांबरीकरण, समाजमंदिर आदि कामांसाठी तीन कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.कळवण पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीकडून ६५ विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करून आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयात दाखल केले होते. त्या प्रस्तावित कामांना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी प्रशासकीय मान्यता देऊन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. कळवण तालुक्यातील आदिवासी गाव, वाड्या, वस्ती व पाड्यावरील आदिवासी बांधवांच्या मागणीनुसार त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मागणींना प्रथम प्राधान्य देऊन गाव , वाडी वस्ती व पाडा तेथे सभामंडप या उपक्र मास कळवण तालुक्यात प्राधान्य देण्यात आले आहे. ठक्कर बाप्पा योजनेतंर्गत कळवण तालुक्यातील सर्व आदीवासी भागातील गाव, वाडे- वस्तीवर विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कळवण पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाला देण्यात आले आहेत. यावेळी नितीन पवार, पंचायत समिती सभापती आशा पवार, उपसभापती विजय शिरसाठ लालाजी जाधव, केदा ठाकरे, मनीषा पवार, मीनाक्षी चौरे, पल्लवी देवरे, जगन साबळे आदि उपस्थित होते.
कळवण तालुक्यासाठी तीन कोटी ६८ लाखांचा निधी
By admin | Published: April 06, 2017 12:55 AM