लासलगांव : लासलगांव बाजार समितीत बुधवारी कांदा भावात ४३० रूपयांची सर्वाधिक भावात तेजी होऊन २५५० रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला.मंगळवारी उन्हाळ कांदा आवक ४०० नग झाली होती. बाजारभाव रूपये प्रती क्विंटल किमान ७०० कमाल २१२० तर सरासरी १७५० रूपये होते तर बुधवारी उन्हाळ कांदा आवक ४२५ वाहनातून झाली व बाजारभाव रूपये प्रती क्विंटल किमान ८०० कमाल २५५० तर भाव सरासरी २२०० रूपये होते.लासलगांव बाजार समितीत गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ५२,३४८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये ३०१ कमाल रु पये १,३९४ तर सर्वसाधारण रुपये १,०८१ प्रती क्विंटल राहीले होते. त्यात या सप्ताहात २५५० भाव आहे, तो वाढण्याची शक्यता आहे. आॅक्टोबरमध्ये नवीन कांदा पहील्या पंधरवड्यात आलेला नाही. आता दुसऱ्या पंधरवाड्यात जर नवीन कांदा बजारात आला नाही तर उन्हाळ कांदा वाढत्या मागणीमुळे तीन हजारपेक्षा अधिक टप्पा गाठणारी असल्याची बाजारपेठेत चर्चा आहे. तरी नोव्हेंबरमध्ये हा कांदा बाजारात येताच, लाल व उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. सध्या अपेक्षित पाऊस नाही. त्यामुळे कोणत्याही भागात किती उत्पादन बाजारपेठेत येईल याचा पक्का अंदाज आता जाणकारांनाही येत नाही. त्यामुळे सर्व भाव वाढीव होण्याची स्थिती येणारी आवकेत व बाजारपेठेत देशातील व परदेशातील मागणीचा दाब यावरच अवलंबून राहणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात खानदेश भागात लवकर येणारा नवीन लाल कांद्याअभावी सध्या येत नाही. तसेच तयार होत असलेला नवीन लालकांदा हा पोषक नाही, त्याला नेहमीसारखे वजन नाही. यामुळे दसरासणापर्यत होणारी आवक कमी आहे. पावसामुळे लाल कांद्याची न झालेली वाढ याचा ताण आवक कमी होण्याची शक्यता असुन त्याचा मागणीचा दाब सध्या सुमार दर्जाचे उन्हाळा कांदा भाव वाढण्याची शक्यता आहे.