सिन्नर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सिन्नर तालुक्यातील तीन रस्त्यांच्या कामासाठी ६ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली. या तीन रस्त्यांच्या पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी ३३ लाख १३ हजार इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.सिन्नर तालुक्यातील पूर्वभागाच्या दळण ङ्क्त वळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला राज्य मार्ग क्रमांक १२ हा पांगरी ते मिठसागरे रस्ता ४.१९ किलोमीटर अंतराचा असून या रस्त्यासाठी २ कोटी ६३ लाख रुपये व ५ वर्ष देखभाल दुरु स्तीसाठी १३ लाख १० हजार रुपये मंजूर झाले आहेत. मानोरी - म्हस्केवस्ती- सुरेगाव या जिल्हा मार्ग २५ क्रमांकाच्या ४.०५ किलोमीटर रस्त्यासाठी २ कोटी १८ लाख व देखभाल दुरुस्तीसाठी १० लाख ८५ हजार तसेच कुंदेवाडी- मुसळगाव- खंबाळे- सुरेगाव राज्य मार्ग क्रमांक १२ च्या २.८० किलोमीटर अंतरासाठी साठी १ कोटी ८४ लाख रुपये व देखभाल दुरुस्तीसाठी ९ लाख १८ हजार रुपये रकमेची तरतूद करण्यात आली आहे.या तीन रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी आमदार राजाभाऊ वाजे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. या तीनही रस्त्यांसाठी ६ कोटी ६५ लाख व देखभाल दुरु स्तीसाठी ३३ लाख १३ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती देण्यात आली.या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील जनतेला वाहतूक करणे सोयीचे ठरणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन कार्यरंभ आदेश मिळणार आहे. या भागातील ग्रामस्थांनी निधी मंजूर झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.