नाशिक : आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटे पत्ते व चुकीचे अंतर नमूद केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर असाच आणखी एक प्रकार एका पालकाने गुरू गोविंदसिंग स्कूलमधील पडताळणी समिती व तक्रार निवारण समितीच्या निदर्शनास आणून दिला होता.आठ दिवसांचा कालावधी होऊनही या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसून संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेशही अबाधित आहे. त्यामुळे तक्रार करणाºया पालकाने पडताळणी समिती व तक्रार निवारण समिती विरोधात थेट शिक्षण उपसंचालकांकडे लेखी तक्रार केल्याने आरटीई प्रवेशप्रक्रिया संशयाच्या घेºयात सापडली आहे.आरटीई अंतर्गत पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी काही पालकांना प्रवेश अर्जात खोटे पत्ते तसेच खोटे अंतर नमूद केल्याचे पहिली सोडत जाहीर झाल्यानंतर निदर्शनास आले आहे.विशिष्ट शाळेतच प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घराचे प्रत्यक्षातील अंतर आणि अर्जावरील अंतर यात फरक दिसून येत आहे. पहिल्या सोडतीतून वंचित राहिलेल्या पालकांनी हा मुद्दा उपस्थित करत मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उदय देवरे यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर देवरे यांनी लक्ष घालण्याच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या अर्जावर कोणताही निर्णय झाला नाही.कारवाईकडे पालकांचे लक्षतक्रारकर्ते पालक संदीप पाटील यांनी पडताळणी समिती व तक्रार निवारण समितीच्या विरोधात थेट शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केल्याने संपूर्ण आरटीई प्रक्रियाच संशयाच्या घेºयात सापडली असून, या प्रकरणी शिक्षण उपसंचालकांक डून काय कारवाई होणार याकडे प्रतीक्षेत असलेल्या पालकांचे लक्ष लागले आहे.
आरटीई प्रवेशप्र्रक्रिया संशयाच्या घेऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:04 AM