नाशिक : आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत (दि.२७) दिलेली मुदत शनिवारपर्यंत (दि.२९) वाढविण्यात आली असून, दुसऱ्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे. मात्र प्राथमिक शाळा सुरु होऊन पंधरवडा उलटूनही आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरुच असून अजूनही दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना तिसऱ्या सोडतीची प्रतिक्षा आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार केव्हा असा प्रश्न निर्माण झाला असून उशीरा प्रवेश मिळल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. आरटीईच्या दुसºया सोडतीत ३६५ शाळांत दोन हजार ३७ मुलांची निवड झाली असून, आतापर्यंत केवळ एक हजार ५९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अजूनही सुमारे नऊशे विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकलेले नाही. त्यामुळे पालकांना पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शनिवारपर्यंत (दि.२९) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एसएमएसद्वारे सोडतीची माहिती पाठविण्यात आली असून, आरटीईच्या संकेतस्थळावर लॉगइन करून अॅप्लिकेशन व्हाइज डिटेल्सयावर क्लिक करून अर्जक्रमांक टाकून पालकांना आपल्या अर्जाची स्थिती माहीत करून घेता येणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या अर्जाची स्थिती माहीत करून घेत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू असून, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिली सोडत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिने झाल्यानंतर अखेर दुसरी सोडत जाहीर झाली आहे. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश घेण्यास दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर दुसऱ्या सोडतीतील प्रवेशांसाठी पहिल्यांदा मुदत वाढ दिली आहे. याप्रक्रियेत आतापर्यंत दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटल्याने अद्याप प्रवेशाची संधी न मिळालेले सुमारे दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे पालक तिसऱ्या सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत.
आरटीई प्रवेशाला पुन्हा मुदत वाढ ; अजूनही दहा हजार विद्यार्थी प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 5:14 PM
आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत (दि.२७) दिलेली मुदत शनिवारपर्यंत (दि.२९) वाढविण्यात आली असून, दुसऱ्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे. मात्र प्राथमिक शाळा सुरु होऊन पंधरवडा उलटूनही आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरुच असून अजूनही दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना तिसऱ्या सोडतीची प्रतिक्षा आहे
ठळक मुद्देआरटीईच्या दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी मुदतवाढशाळा सुरू होऊन पंधरवडा उलटूनही प्रवेश प्रक्रिया सुरुच प्रवेशप्रक्रियेतील उशीरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान