नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) मागास व आर्थिक दुर्बळ घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रेवशासाठी राबविण्यात येणारी प्रवेशाची प्रक्रिया यंदा तब्बल दीड ते दोन महिने उशीराने सुरु झाल्यानंतरही या प्रक्रियेत अजूनही दिरंगाईच सुरू असल्याचे दिसून येत आहे. आरटीईची पहिली सोडत जाहीर झाल्यानंतर प्रवेशासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. याकालावधीत आतापर्यंत २ हजार ४८४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून प्रवेशासाठीची मूदत १० मे रोजी संपली. त्यानंतर सहा दिवस उलटूनही पुढील प्रवेशप्रक्रियेबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने नाशिकसह राज्यभरातील प्रवेशोत्सूक विद्यार्थ्यांच्या पालकांचे लक्ष दुसऱ्या सोडतीकडे लागले असून यात नाशिकमधील सुमारे १२ हजार ७० पालकांचा समावेश आहे. आरटीई अंतर्गत शाळांमध्ये २५ टक्के बालकांना प्रवेश देण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने ८ एप्रिल रोजी पहिली सोडत जाहीर केली होती. यातील पहिल्या यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पहिल्यांदा २६ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. मात्र, पालकांच्या मागणीनुसार त्यात ४ मेपर्यंत वाढ करण्यात आली होती.त्यानंतर पुन्हा सहा दिवसांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० मे पर्यंत २ हजार ४८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. अजूनही नाशिक शहर व जिल्ह्यातील १२ हजारांवर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून त्यांचे लक्ष आता दुसऱ्या सोडतीकडे लागले आहे.
आरटीईची प्रवेशप्रक्रिया लांबली ; पालकांना दुसऱ्या सोडतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 4:08 PM
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)मागास व आर्थिक दुर्बळ घटकांतीव विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रेवशासाठी राबविण्यात येणारी प्रवेशाची प्रक्रिया यंदा तब्बल दीड ते दोन महिने उशीराने सुरु झाल्यानंतरही या प्रक्रियेत अजूनही दिरंगाईच सुरू असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई विद्यार्थी, पालकांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा