पोलिसांची सक्ती : रेडियम आर्ट व्यावसायिकांना बजावल्या नोटिसा
पाथर्डी फाटा : शहरात दुचाकी व चारचाकी वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाहनांची नंबर प्लेट बनविण्याºया रेडियम आर्ट व्यावसायिकांना पोलिसांनी नोटीस पाठवून व्यवसायाची आचारसंहिता पाळण्याची तंबी दिली आहे. कोणत्याही वाहनांवर नंबर टाकताना आरटीओकडे नोंदणी झाल्याची कागत्रपत्रे बघून त्यानुसारच क्रमांक टाकण्याचे बजावण्यात आले आहे. त्याचबरोबर एखाद्या प्रकरणात चोरट्याने वापरलेल्या वाहनाचा क्रमांक शहानिशा न करता लिहिल्याचे आढळल्यास अशा नंबर टाकणाºया व्यावसायिकांवरच कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहेशहरात सध्या इतर गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली असताना दुचाकी व चारचाकी वाहन चोरीच्या घटनाही वाढलेल्या आहेत. त्याच वाहनांवरचे आरटीओने दिलेले क्र मांक बदलून त्यांची अन्यत्र विक्री व वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. बºयाचदा चोरीचे व नंबरप्लेट बदललेले वाहनं चोरी व इतर गुन्ह्यांमध्ये वापरले जाते गुन्ह्यांचा तपास करताना अशीक्रमांक बदललेली वाहनं आढळून आल्यास वाहनांच्या मालकांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. या सर्व प्रकारांत वाहनांवर आरटीओ पासिंगचे क्रमांक बनवून नंबर प्लेट वाहनांना लावून देणाºया रेडियम आर्ट व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही वाहनावर क्रमांक टाकताना आधी आरटीओच्या नोंदणीची कागदपत्रे त्यांनी दिलेला नंबर तपासून घेणे आवश्यक असते. परंतु तसे न करता किंवा हे व्यावसायिक कोणतेही कागदपत्र, पुरावे न बघता वाहनधारक सांगतील तो क्रमांक टाकून देतात. त्यामुळे चोरट्यांचे फावते आहे. त्यामुळे पोलिसांनी व्यावसायिकांना नोटिसा पाठविल्या असून, आरटीओच्या कागदपत्रांची शहानिशा करूनच नंबर प्लेटवर नंबर टाकावेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी असे केले नियमरेडियम आर्ट व्यावसायिकांकडे वाहनांवर नंबर टाकायला वाहन आणताना सोबत वाहनाचे मूळ कागदपत्र व आधारकार्ड अथवा इतर ओळखपत्र आणावे अन्यथा नंबर टाकून मिळणार नाही या सूचनेचा बोर्ड लावावा.नंबर टाकण्यासाठी आणलेल्या वाहनांच्या मूळ कागदपत्रांच्या इतर ओळखपत्राच्या छायांकित प्रति घेऊन त्या संग्रही ठेवाव्यात.दुकानांमध्ये रजिस्टर ठेवून त्यामध्ये नंबर टाकण्यासाठी आलेल्या इसमाचे नाव, पत्ता, मोबाइल क्र मांक तसेच वाहनाचा प्रकार त्याचे चेसीस आणि इंजिन नंबर, दिनांक टाकून नमूद करावा.वाहनमालकानेच वाहन आणल्याची खात्री झाल्यावरच नंबर टाकावा.वाहनमालकाविषयी संशय वाटत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.पोलिसांनी केलेल्या सूचना खूप महत्त्वाच्या व आवश्यक अशा आहेत. मात्र त्या कानाकोपºयातील सर्व व्यावसायिकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत आणि त्यांच्या अंमलबजावणीकडे यंत्रणेने लक्ष पुरवायला हवे अन्यथा ज्यांना नोटिसा मिळाल्या ते किंवा प्रामाणिकपणे व्यवसाय करणाºयांनाच फक्त त्याचा त्रास होऊ नये. या कामी क्यू आर कोडचाही वापर केल्यास पोलिसांचा हेतू बºयापैकी साध्य होऊ शकतो.- सचिन अहेर, रेडियम आर्ट व्यावसायिक