मखमलाबाद : अभिनव बालविकास विकासमंदिर, मखमलाबाद शाळेत नाशिक महानगरपालिकामार्फत गोवर आणि रुबेला या आजाराचा संसर्ग कुणालाच होऊ नये याकरिता गोवर -रुबेला लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘लसीकरणाची किमया न्यारी; आरोग्य नेई आपल्या दारी’ घोषवाक्याचा नारा देत, सर्व विद्यार्थ्यांनी आनंदात सहभाग घेतला. या लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. नितीन टिळे, मविप्र संचालक सचिन पिंगळे, संजय फडोळ, संपतराव पिंगळे, ज्योती गावित, रेवती काळे, निर्मला बागुल, मालती बागूल, सीमा कुंभार, संगीता तांदळे, सविता धात्रक, मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे, डॉ. सुवर्णा गायकवाड उपस्थित होते आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.