मालेगाव : तालुक्यातील माणके-दहिकुटे शिवार वेशीवर सिमेंटच्या पाइपात दडी मारून बसलेला बिबट्या पसार झाला आहे. त्यामुळे बिबट्याला पकडण्याची संधी हुकली असून, परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.माणके-टोकडे-दहिकुटे या गावांच्या सामाईक शिवार वेशीवर शुक्रवारी बिबट्याने दर्शन दिले होते. हा बिबट्या शनिवारी या सीमेवर असलेल्या उतावळी नदीच्या एकवीरा मोरीच्या पाटचारीसाठी टाकण्यात आलेल्या सिमेंट पाइपात बसलेला आढळला. त्यामुळे परिसरात चर्चा होऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने या पाइपाच्या एका तोंडावर पिंजरा लावून दुसरी बाजू बंद केली होती. त्यामुळे हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालेला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बिबट्याने घाबरून पाइपात राहणे पसंत केले होते. वनविभागाने लावलेला पिंजरा पाइपाला घट्ट लावलेला नव्हता. त्यामुळे पाइप व पिंजरा यात मोकळी पोकळी निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)
माणके शिवारातील बिबट्या पसार
By admin | Published: May 10, 2016 10:04 PM