गिरीश जोशी।वेळ : सकाळी ११ वाजताठिकाण : निमोण चौफु ली, मनमाडमर्ॉिनर््ंाग वॉकसाठी जाणाºया नागरिकांवर भुंकणाºया कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले असून, दररोज घडणाºया या प्रकारामुळे जीव धोक्यात घालण्यापेक्षा काही नागरिकांनी रस्ता बदलून चांदवड रोडकडे फिरायला जाणे सुरू केले. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहे. शहरातील कार्यालये, बसस्थानक, रेल्वे जनरल वेटिंग हॉल ही भटक्या कुत्र्यांची आराम करण्याची प्रमुख ठिकाणे बनली असल्याने या ठिकाणी येणाºया नागरिकांना जीव धोक्यात घालून आत प्रवेश करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले. गेल्या काही वर्षांपूर्वी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडून विषारी औषध देऊन कुत्री ठार करण्यात येत; मात्र कायद्याने यावर बंधन आल्याने ही पद्धत बंद करण्यात आली. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने उपद्रव वाढला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये येणाºया जाणाºया नागरिकांची कितीही वर्दळ वाढली तरी प्रवेशद्वाराजवळ झोपलेल्या कुत्र्यांवर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. शहराच्या काही भागात या मोकाट कुत्र्यांचा मुक्काम रात्री रस्त्यावरच असतो. या रस्त्यावरून जाणाºया नागरिकांचा तसेच वाहनधारकांचा ही कुत्री पाठलाग करतात. वाहनास कुत्री आडवी आल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोकाट कुत्र्यांच्या भररस्त्यातील मुक्कामामुळे वाहनधारकांबरोबरच पादचाºयांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. शहराच्या प्रत्येक भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने लहान मुलांना एकट्याला घराबाहेर पाठवणे सुद्धा अवघड झाले आहे. मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांचे लचके तोडण्याच्या घटना नेहमीच घडू लागल्याने आता तरी नगरपालिका प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.मोकाट जनावरांचे ‘जंक्शन’ विश्रामगृह...मनमाड रेल्वेस्थानकावरील द्वितीय श्रेणी विश्रामगृहातील मोकाट जनावरांच्या मुक्त संचारामुळे प्रवासीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या स्थानकावरून दररोज सुमारे २१० प्रवासी गाड्या जा-ये करतात. दररोज तब्बल पंधरा हजार प्रवाशांची वर्दळ असलेल्या या रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ द्वितीय श्रेणी विश्रामगृह असून, प्रवाशांची नेहमी गर्दी असते. या विश्रामगृहात मोकाट जनावरांचा नेहमी वावर असतो. मोकाट जनावरांच्या वास्तव्यामुळे या विश्रामगृहाला गोठ्याचे स्वरूप प्राप्त होत असते. जनावरांच्या शेणामुळे घाणीचे साम्राज्य पसरत असल्याने प्रवासीवर्गाला येथे थांबणे अवघड होत असते. रेल्वेस्थानकावरील स्वच्छतेबाबत रेल्वे प्रशासनाकडून फारशी काळजी घेण्यात येत नाही.मोकाट जनावरांचा उच्छाद!मनमाड शहरात मोकाट जनावरांनी मोठा उच्छाद मांडला आहे. मोकाट वळू व मोकाट कुत्र्यांच्या दिवसेंदिवस वाढत्या संख्येमुळे नागरिकांना मोठा उपद्रव सहन करावा लागतो. शहराच्या मुख्य बाजारपेठेत मोकाट वळूंच्या तासन्तास चालणाºया झुंजीचे प्रकार आता नित्याचे झाले आहे. यामुळे काही जणांना तर जखमी झाल्यामुळे रुग्णालय गाठावे लागले.
मोकाट जनावरांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:19 AM