नाशिकरोड : वैदिक धर्म संस्थान, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांसाठी रुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले होते. कारागृहात बंदीवासात असताना आत्मशांती लाभावी आणि मन निरोगी रहावे यासाठी आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने श्रावणमासानिमित्त रुद्रपूजा करण्यात आली. प्रथम कार्र्र्र्यक्रमात १०८ वेळा ॐ नम: शिवायचा मंत्रजप करण्यात आला. त्यानंतर प्राणायाम, गुरुपूजा, रुद्रपूजा व सत्संगामध्ये बंदीजनांनी उत्साहाने सहभाग घेतला. सदर कार्यक्रमात १५० बंदीजनांनी ध्यानाची अनुभूती घेतली. या रुद्रपूजेसाठी आर्ट आॅफ लिव्हिंगचे महाराष्ट्र प्रिझन कोर्स संयोजक अशोक गवळी यांनी आयोजन केले होते. तसेच वैदिक धर्म संस्थानचे स्वामी प्रवीण व पाच वेद पंडित, खंडू गांगुर्डे व आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रशिक्षक सुनील नाईक, प्रकाश दुसाने, माधवी नाईक आदि उपस्थित होते. तसेच मध्यमर्ती कारागृहाचे अधीक्षक जयंत नाईक, वरिष्ठ अधीक्षक के. पी. भवर, तुरुंगाधिकारी आनंदे कांदे, सुनील कुवर, संजय मयेकर, कर्मचारी विष्णुलाल राठोड, गणपत खोकले हेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कारागृहातील बंदीजनांसाठी रुद्रपूजा
By admin | Published: September 08, 2015 11:38 PM