नाशिक : जीवन हे नाशवंत असून, यामध्ये काळाचा महिमा मोठा आहे़ मनुष्य जीवनात जे कर्म करतो त्यानुसारच त्यास फळ मिळते़ कर्मानुसार फळ हा नियमच असल्याचे प्रतिपादन स्वामीनी स्थितप्रज्ञानंद यांनी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ‘कठोपनिषदाचे अंतरंग’ या विषयावरील प्रवचनात केले़ मातोश्री पार्वतीबाई गोसावी यांच्या ३७व्या वार्षिक स्मृतिदिनानिमित्त पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या दिवशी त्या बोलत होत्या़ स्वामीनी स्थितप्रज्ञानंद यांनी सांगितले की, कृष्ण यजुर्वेदात कठोपनिषदाचा समावेश आहे़ यामध्ये नचिकेता आणि यमराज यांच्यातील संवाद असून, अज्ञानाकडून ज्ञानापर्यंत पोहोचण्याचे हे सुलभ साधन आहे़ कर्माचे तीन प्रकार असून, पहिल्या कर्मामध्ये फळ त्वरित मिळते, दुसऱ्यात काही वेळ थांबावे लागते, तर तिसऱ्यामध्ये काही काळाची प्रतीक्षा करावी लागते़ या तिन्ही प्रकारातील कर्माचे फळ भोगण्यासाठी मनुष्याला वेगवेगळ्या योनीत जन्म घ्यावा लागतो, तर काही वेळा पुनर्जन्मदेखील घ्यावा लागतो़
मनुष्यास जीवनातील कर्मानुसार फळ हा नियम : प़पू़स्थितप्रज्ञानंद
By admin | Published: February 04, 2015 1:28 AM