गेल्या तीन दिवसांपासून गोविंदनगर परिसरात कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे मेसेज मोबाइलवर व्हायरल होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते, व्हायरल मॅसेजमुळे भीती असली तरी दैनंदिन व्यवहार सुरळीत असल्याने विशेष फरक जाणवत नव्हता. स्थानिक नागरिकांनी याबाबत महापालिकेच्या सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता आरोग्य विभागाने संभाव्य इमारती आणि परिसरातील व्यावसायिक यांच्या रॅपिड टेस्ट केल्या त्यात काही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. परिसरात २४ रुग्णच असल्याचे डॉ. मयुर पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता तसे काही आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. परिसरातील ६ बिल्डिंग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. बॅरिकेटदेखील लावण्यात आले आहेत.
===Photopath===
200321\20nsk_15_20032021_13.jpg
===Caption===
गोविंद नगर परीसर