शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ठेकेदाराला संगणकाचे देयक देण्यासाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 1:03 AM

आमदार, खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून १२६ संगणकांची खरेदी करणाऱ्या जिल्हा नियोजन विकास समिती कार्यालयाची यासंदर्भातील सारीच वाटचाल संशयास्पद असून, अवघ्या महिन्या-दीड महिन्यातच संगणक पुरविण्याचा ठेका सांगलीच्या कंपनीला देऊन ‘कार्यभाग’ साधताना आता संगणकाचे देयक ठेकेदाराला लवकरात लवकर अदा करण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे.

नाशिक : आमदार, खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून १२६ संगणकांची खरेदी करणाऱ्या जिल्हा नियोजन विकास समिती कार्यालयाची यासंदर्भातील सारीच वाटचाल संशयास्पद असून, अवघ्या महिन्या-दीड महिन्यातच संगणक पुरविण्याचा ठेका सांगलीच्या कंपनीला देऊन ‘कार्यभाग’ साधताना आता संगणकाचे देयक ठेकेदाराला लवकरात लवकर अदा करण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. विशेष म्हणजे खरेदी केलेले संगणक कराराप्रमाणे ठेकेदाराने पुरविले की नाही याची तपासणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून करण्याचे ठरविले असताना तशी तपासणीदेखील करण्यात आली नसल्याचे उघडकीस आले आहे.नाशिक जिल्ह्यातील दोन खासदार व पाच आमदारांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध शासकीय कार्यालये, शाळांसाठी संगणक पुरविण्याचे प्रस्ताव जिल्हा नियोजन विकास समिती कार्यालयात सादर केले असता १२६ संगणक खरेदीसाठी जाहीर निविदा मागवून सांगलीच्या एका कंपनीस त्याचा ठेका देण्यात आला.तथापि, निविदेत नमूद केलेल्या संगणकाचे मॉडेल व स्पेसिफिकेशनप्रमाणे ठेका भरणाºया कंपनीने प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी दर्जाचे व वेगळ्या मॉडेलचे संगणक पुरवून पैसे लाटल्याची बाब निदर्शनास आली आहे. शासकीय कराराप्रमाणे एका संगणकाची किंमत ३४ हजार रुपये दर्शविण्यात आलेली असताना, ठेकेदाराने पुरविलेल्या संगणकाची बाजारात २२ ते २३ हजार रुपये किंमत असल्याचे आढळून आले आहे.या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच संबंधितांचे धाबे दणाणले आहे. याबाबत चौकशी होऊन कार्यवाही होण्याअगोदरच जिल्हा नियोजन अधिकाºयाकडून संगणक पुरविणाºया ठेकेदाराचे ४२ लाख ८४ हजार रुपयांचे देयक अदा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.दोन दिवसांपूर्वी त्यांनी देयक तयार करून ते जिल्हाधिकाºयांकडे मंजुरीसाठी पाठविले असल्याचे वृत्त आहे. या साºया प्रकारात काहीतरी काळेबेरे असल्याचे लपून राहिलेले नसून, जिल्हा नियोजन कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय