नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहराची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक शहरात दाखल झालेले असून, दोन दिवसांपासून विविध ठिकाणी पथक भेटी देत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे. दरम्यान, शहराला फाइव्ह स्टार मिळावे यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू झाले असून, महापौर सतीश कुलकर्णी यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराला स्पर्धेत अव्वल आणण्यासाठी आवाहन केले आहे.स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेचे हे पाचवे वर्षे असून, यापूर्वी शहरास ‘थ्री स्टार’ मानांकन मिळाले असून, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी फाइव्ह स्टार रेटिंग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील नागरिकांनी आपला सकारात्मक प्रतिसाद वाढवावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे. शहरात स्वच्छता राखण्याचे काम महापालिकेकडून केले जात असताना हे उत्तम होण्यासाठी नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग महत्त्वाचा आहे.या स्पर्धेतील महत्त्वाचा भाग असलेला नागरिकांचा प्रतिसाद याअंतर्गत नागरिकांकडून केंद्रीय पथकाद्वारे नागरिकांना फोनद्वारे विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरास प्रतिसाद न गेल्याने स्पर्धेतील गुणानुक्र म कमी होऊन स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेत नाशिक शहरास अद्यापपर्यंत पारितोषिक प्राप्त झालेले नाही, त्यामुळे महापौरांनी हे आवाहन केले आहे.अधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला आढावाकेंद्रीय पथकाने शहराच्या विविध भागांत पाहणी केली. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी या कामासाठी तैनात असल्याने आरोग्य समितीच्या सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.१७) डेंग्यूसंदर्भात बोलाविलेली बैठक होऊ शकली नाही.केवळ हिवताप निर्मूलन अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावाघेतला.
‘फाइव्ह स्टार’ मिळविण्यासाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 11:54 PM