शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

चौकीदाराच्या पगारात घर चालवून दाखवा : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 1:45 AM

मै चौकीदार हुँ, मै चायवाला हुँ असे म्हणून चौकीदार आणि चायवाल्याची विटंबना मोदी सरकारने सुरू केली असून, चौकीदाराला जितका पगार मिळतो तेवढा पगार घ्या आणि घर चालवून दाखवा, असे खुले आव्हान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वत:ला ‘मै चौकीदार’ म्हणवून घेणाऱ्यांना दिले आहे.

नाशिक : मै चौकीदार हुँ, मै चायवाला हुँ असे म्हणून चौकीदार आणि चायवाल्याची विटंबना मोदी सरकारने सुरू केली असून, चौकीदाराला जितका पगार मिळतो तेवढा पगार घ्या आणि घर चालवून दाखवा, असे खुले आव्हान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वत:ला ‘मै चौकीदार’ म्हणवून घेणाऱ्यांना दिले आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिकरोड व पंचवटी येथे आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या निवडणुकीत मनुस्मृतीला विरोध करून डॉ. आंबेडकरांनी दिलेली घटना वाचविण्यासाठी मतदान करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी खासदार डॉ. प्रताप वाघ, माजी महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष शरद आहेर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.आपल्या भाषणात भुजबळ यांनी मोदी सरकारवरही तोफ डागली. ते म्हणाले, राज्यातील ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास अद्यापही होत नाही, मग तुम्ही करतात काय? असा सवाल करून, उच्च न्यायालयाने फडणवीस यांना चांगलेच फटकारल्याने या सरकारने या प्रकरणी नाकर्तेपणाची जबाबदारी स्वीकारून सत्तापदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र देवेंद्र फडणवीस गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्याप्रमाणे सत्तेला चिटकून राहत असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला.