शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

मांजरीच्यामागे धावत बिबट्या पत्र्यावर चढला अन् थेट घरात पडला; डरकाळ्यांनी रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला

By अझहर शेख | Published: August 11, 2022 8:02 PM

leopard in Nashik: नाशिक येथील भगूर गावापासून पुढे असलेल्या लहवीत शिवारात गुरुवारी (दि.११) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक भला मोठा बिबट्या मांजरीच्या शिकारीकरिता घरावर चढला; मात्र त्याचे वजन व धावण्यामुळे पत्रा तुटला अन् बिबट्या थेट स्वयंपाकघरात कोसळला.

- अझहर शेख नाशिक - येथील भगूर गावापासून पुढे असलेल्या लहवीत शिवारात गुरुवारी (दि.११) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक भला मोठा बिबट्या मांजरीच्या शिकारीकरिता घरावर चढला; मात्र त्याचे वजन व धावण्यामुळे पत्रा तुटला अन् बिबट्या थेट स्वयंपाकघरात कोसळला. यावेळी झालेला आवाज अन् बिबट्याने फोडलेल्या डरकाळ्यांनी गाढ झोपलेले रहिवासी खडबडून जागे झाले. सुदैवाने या घटनेत बिबट्याने रहिवाशांपैकी कोणालाही जखमी केले नाही. त्यामुळे वनखात्यासह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

नाशिक शहरासह आजूबाजूच्या गावांचा परिसर जणू बिबट्यांचा मूळ अधिवास बनत चालला आहे. नाशिककरांना बिबट्या लोकवस्तीत अथवा त्याच्याकडून कधी पशुधनावर, तर कधी मानवी हल्ले तसे नवीन राहिलेले नाही; मात्र दारणाकाठालगत असलेल्या लहवीत गावाच्या शिवारात गुरुवारी मध्यरात्री घडलेली घटना यापेक्षा ‘हटके’ अशीच आहे. आतापर्यंत बिबट्या असा घरात कोसळल्याची घटना यापूर्वी नाशिकमध्ये घडलेली नाही, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शुभम बाळू गायकवाड यांचे लहवीत गावात पत्र्याचे घर आहेत. घरात त्यांच्यासह तीन महिला तीन लहान मुले असे सात सदस्य मध्यरात्री गाढ झोपेत होते. यावेळी पत्र्यावर मोठा आवाज झाला अन् स्वयंपाक घरात अचानकपणे पावसाचे पाणी येऊ लागले. यामुळे सर्व सदस्य जागे झाले. त्यांनी घरातील दिवे सुरू केले अन् नजरेसमोर आला तो दबा धरून बसलेला बिबट्या. त्याच्या गुरगुरण्याने व डरकाळीने रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.

रहिवाशांकडून माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे हे रेस्क्यू पथकासह पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले. वनपाल, वनरक्षकांनी घराभोवती जाळ्या लावून विजेऱ्यांच्या प्रकाशात पाहणी केली असता घरात बिबट्या आढळला नाही. तो पुन्हा तुटलेल्या पत्र्याच्या ठिकाणाहून वर येऊन लगतच्या लष्करी हद्दीतील जंगलात पळाला.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक